Connect with us

गोवा खबर

मिशन फॉर लोकलतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

Published

on

File photo
Spread the love

गोवा खबर : मिशन फॉर लोकल पेडणेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सजावट/आरास देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पर्यावरणीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, आरोग्याबाबत संदेश देणारे किंवा यासंकल्पनेवर आधारित देखावे असावेत, अशी अट घालण्यात आली आहे. देखाव्याच्या संकल्पनेची माहिती देणारे निवेदन स्पर्धक मंडळांनी परीक्षक मंडळाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे.

देखाव्याचे मूल्यमापन तीन परीक्षकांतर्फे करण्यात येणार आहे. परीक्षण करताना मूळ संकल्पना, ती प्रत्यक्षात दाखवण्याचे कौशल्य, विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर, वातावरण निर्मिती, संदेश परिणामकारकता इ. मुद्यांचा विचार करण्यात येईल.

ही स्पर्धा तालुका स्तरावर घेण्यात येईल व पुढील प्रमाणे पारितोषिक व सोबत प्रमाणपत्रे देण्यात येतील. पहिले रु. 20,000/-, दुसरे रू. 15,000/-, तिसरे रू. 10,000/- तर प्रत्येकी 4,000/- रूपयांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या मंडळांनी 7 सप्टेंबरपर्यंत मिशन फॉर लोकल, पेडणे येथे नावनोंदणी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा (8668974505), असे आवाहन राजन कोरगावकर यांनी केले आहे.