Connect with us

गोवा खबर

आरोग्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक ; उपजिल्हा इस्पितळांची होणार अचानक पाहणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : आरोग्य केंद्रांतील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. तसेच उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी उपजिल्हा इस्पितळांची अचानक तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात आरोग्य सेवा प्रणाली अधिक सशक्त करण्यासाठी या बैठकीत चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात दर १५ दिवसांनी आढावा बैठक घेऊन आरोग्य सुविधांची नियमित पाहणी करुन आवश्यक तेथे वेळेत कारवाई केली जाईल. या आढावा बैठकीत राज्यभरातील आरोग्य केंद्रांनी त्यांच्या निश्चित गरजा मांडाव्यात. जेणे करुन त्या पूर्ण करणे शक्य होतील, असा निर्णयही झाल्याचे राणे यांनी नमूद केले.
आरोग्य केंद्र व उपजिल्हा इस्पितळे सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेची आहे. त्यानुसार आरोग्य केंद्रांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. तसेच राज्यातील उपजिल्हा इस्पितळांची अचानक तपासणी केली जाईल. यामुळे यात आवश्यक ती सुधारणा करणे शक्य होईल. याशिवाय बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यय इस्पितळाच्या मदतीने राज्यभरातील आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. जेणे करुन नागरिकांपर्यंत अत्यावश्यक सुविधा पोचवणे हा त्यामागील हेतू आहे. तुये इस्पितळाला उपजिल्हा इस्पितळाचा दर्जा दिला जाणार असून यात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध असतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.