गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वॉर्सा येथे पोलंडच्या कबड्डी महासंघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको आणि पोलंडच्या कबड्डी महासंघाच्या बोर्ड सदस्य ऍना काल्बार्झिक यांची भेट घेतली.
पोलंडमध्ये कबड्डीला प्रगतीपथावर नेण्यात आणि युरोपमध्ये या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी केलेल्या सहयोगाबद्दल पंतप्रधानांनी स्पिक्झको आणि काल्बार्झिक यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी भारत आणि पोलंडमधील द्विपक्षीय संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यात खेळांची भूमिका अधोरेखित केली.