Connect with us

गोवा खबर

जागतिक उलथापालथींनी देशांतर्गत संरक्षण उद्योगाला उत्पादन क्षमता वाढवून भारताला प्रमुख निर्यातदार बनवण्याची संधी दिली: सीडीएस जनरल अनिल चौहान 

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:जागतिक उलथापालथींनी भारतीय संरक्षण उद्योग परिसंस्थेला आपल्या उत्पादन क्षमतांमध्ये वाढ करण्याची संधी दिली आहे,जेणेकरून भारताला शस्त्रांचा एक आयातदार या भूमिकेतून शस्त्रांचा त्याबरोबरच त्याबरोबरच दारुगोळ्याच्या प्रमुख निर्यातदारामध्ये रुपांतरित होण्याची संधी दिली असल्याचे  प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी केले आहे.ते आज 8 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीत फिक्की या उद्योग संघटनेने आयोजित केलेल्या ऍमो इंडिया 2024 या परिषदेत बोलत होते.

जागतिक भू-राजकीय वातावरण अतिशय अस्थिर स्थितीत आहे, असे सीडीएस म्हणाले. “आपण अतिशय मोठ्या जागतिक अस्थिरतेच्या युगातून वाटचाल करत आहोत. जगातील स्फोटक, अनिश्चित, गुंतागुंतीच्या आणि संदिग्धतेच्या (VUCA) अस्पष्ट स्थितीत, जागतिक शस्त्र उद्योग मागणी आणि पुरवठ्यातील वाढलेल्या तफावतीच्या वरकरणी अशक्य वाटणाऱ्या समस्येशी झगडत आहे,” यावर त्यांनी भर दिला.

जनरल अनिल चौहान यांनी आत्मनिर्भरता आणि संरक्षण स्वयंपूर्णतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि देशासाठी धोरणात्मक सार्वभौमत्व प्राप्त करणे किती महत्त्वाचे आहे त्यावर भर दिला.त्यांनी संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण दलांनी मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड मोहिमेला विशेषतः दारुगोळा उत्पादनामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी केलेले विविध धोरणात्मक बदल,सुधारणा आणि हाती घेतलेले उपक्रम यांचा उल्लेख केला.नागरी-लष्करी मिश्रणाचे महत्त्व अधोरेखित करत सीडीएसनी संरक्षण दले, संरक्षण उद्योग आणि शैक्षणिक संस्थांसह वैज्ञानिक या त्रिशक्तींना देशाच्या आत्मनिर्भरता मोहिमेला चालना देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमात विविध सत्रे आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये रणगाडे आणि एएफव्ही यांच्या दारुगोळ्याच्या गरजा, तोफखाना, हवाई संरक्षण, हवाई आणि नौदल, मानवरहित प्लॅटफॉर्म्ससाठी दारुगोळा, लॉयटरिंग ऍम्युनिशन(आत्मघाती हल्ला करणारी प्रणाली) आणि फ्युचरिस्टिक म्युनिशन्स त्याबरोबरच लहान शस्त्रांबाबत चर्चा करण्यात आली. दारुगोळ्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणाऱ्या एका प्रदर्शनाचे देखील सीडीएसनी उद्घाटन केले.