गोवा खबर : पणजीतील पशू संवर्धन आणि पशू चिकित्सा खाते राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमाखाली 19 ऑगस्टपासून जनावरांच्या पाय आणि तोडांला होणार्या रोगांविरुद्ध लस देण्याच्या कार्यक्रमास सुरुवात करणार आहे.
या कार्यक्रमाखाली सर्व जनावरे आणि म्हशींना लस देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनावरांची रोगप्रतिकार शक्ती तपासण्यासाठी लस देण्यापूर्वी आणि त्यानंतर सेरा नमुने घेण्यात येणार आहेत.
मार्गदर्शक तत्वानुसार लसीकरण केलेल्या जनावरांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या कानाला बिल्ला लावणे अनिवार्य आहे. लसीकरणावेळी खात्याच्या कर्मचार्यांना व पथकाला सहकार्य करण्याची विनंती दुग्ध शेतकर्यांना करण्यात आली आहे.