Connect with us

गोवा खबर

अ‍ॅनिमियामुक्त भारतासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना

Published

on

Spread the love
  • पोषणघटकयुक्त तांदूळ अभियानाअंतर्गत लोह, फॉलिक आम्ल आणि विटामिन बी12 युक्त तांदूळाचा टप्प्याटप्प्याने पुरवठा

गोवा खबर : लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले आणि महिलांमध्ये ॲनिमियाचे म्हणजेच रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार ॲनिमिया मुक्त भारत (एएमबी) धोरणाची अंमलबजावणी करत आहे. या 6X6X6 जीवनचक्र धोरणाचे उद्दीष्ट सहा वयोगटातींल लाभार्थींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याचे असून ते वयोगट म्हणजे 6-59 महिन्यांची मुले, 5-9 वर्षांची मुले, 10-19 वर्षे वयोगट, प्रजननक्षम वयोगटातील (15-49 वर्षे) महिला, गरोदर महिला आणि स्तनदा माता या सहा गटांमध्ये सहा उपाययोजना सरकार करत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया सिंह पटेल यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

पोषण अभियान 2.0 हा भारत सरकारचा महत्त्वाचा कार्यक्रम असून कुपोषणाच्या आव्हानावर मात करून सुधारित आरोग्य आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी लोकसमुदायांना सहभागी करून घेण्याचा याचा उद्देश आहे. त्यामध्ये अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचणे, आरोग्यदायी सवयींचा पुरस्कार व त्यासाठी वागणुकीत बदल घडवून घेण्याचे या अभियानाचे उद्दीष्ट आहे.

मातांचे पोषण, नवजात शिशु व लहान मुलांसाठी आहाराचे नियम, गंभीर तीव्र कुपोषण/ मध्यम तीव्र कुपोषण आणि आयुष पद्धतींमार्फत उत्तम आरोग्यप्राप्ती याद्वारे कमी वजन, खुरटलेली वाढ आणि रक्तक्षयाचा प्रभाव कमी करणे या बाबी पोषण अभियानाच्या केंद्रस्थानी आहेत. 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुले, गरोदर व स्तनदा माता  व पौगंडावस्थेतील मुली (आकांक्षी जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांमधील 14-18 वर्षे वयोगटातील मुली) यांची पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी पूरक अन्नाचा पुरवठा केला जाणार आहे.सप्टेंबर व मार्च-एप्रिल महिन्यांत अनुक्रमे पोषण मास आणि पोषण पंधरवडे साजरा केले जाणार आहेत. या काळात रक्तक्षयाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल.

रक्तक्षयावर मात करण्यासाठी, लोह, फॉलिक आम्ल आणि विटामिन बी12 ने युक्त फोर्टिफाईड राईस अर्थात पोषणघटकयुक्त तांदळाचा पुरवठा सरकारतर्फे केला जात आहे. हा तांदूळ  सरकारच्या लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली  (टीडीपीएस), प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम-पोषण) योजना, एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजना आणि इतर कल्याणकारी योजना (ओडब्ल्यूएस) मार्फत टप्प्याटप्प्याने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरवला जात  आहे. नेहमीच्या गिरणीतून आलेल्या तांदळाऐवजी सरकारच्या प्रत्येक योजनेत पोषणघटकयुक्त तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे.

लाभार्थ्यांमध्ये लोह, फॉलिक आम्लाच्या प्रमाणाधारे एएमबीच्या प्रगतीचे मूल्यमापन केले जात आहे.

State-wise Iron Folic Acid (IFA) coverage among women across the country

(Source: HMIS 2023-24)

States/
Union Territories
Percentage of Pregnant women provided 180 IFA Red tablets Percentage of Lactating women provided 180 IFA Red tablets
India 95.0 65.9
A & N Islands 61.9 77.5
Andhra Pradesh 95.0 86.1
Arunachal Pradesh 91.5 57.4
Assam 95.0 65.4
Bihar 90.8 51.4
Chandigarh 95.0 95.0
Chhattisgarh 95.0 79.8
D&DH and D&D 95.0 95.0
Delhi 95.0 62.6
Goa 95.0 80.6
Gujarat 95.0 95.0
Haryana 95.0 59.7
Himachal Pradesh 89.7 72.1
Jammu & Kashmir 95.0 73.2
Jharkhand 92.4 76.2
Karnataka 95.0 88.3
Kerala 95.0 61.8
Ladakh 95.0 79.8
Lakshadweep 95.0 79.1
Madhya Pradesh 95.0 65.5
Maharashtra 95.0 61.9
Manipur 46.4 33.6
Meghalaya 68.6 64.2
Mizoram 81.5 64.6
Nagaland 71.7 42.4
Odisha 95.0 81.1
Puducherry 95.0 95.0
Punjab 72.8 49.4
Rajasthan 95.0 79.7
Sikkim 93.4 89.3
Tamil Nadu 95.0 61.9
Telangana 95.0 78.3
Tripura 95.0 58.6
Uttar Pradesh 95.0 46.8
Uttarakhand 95.0 64.6
West Bengal 95.0 92.3