Connect with us

गोवा खबर

कला-संस्कृती खात्यातर्फे माटोळी व देखावा स्पर्धा

Published

on

Spread the love

गोवा खबर : कला व संस्कृती संचालनालयातर्फे गणेशोत्सवादरम्यान पारंपरिक सजावटीच्या माध्यमातून जैवविविधता जतन करण्याच्या जुन्या परंपरेला चालना देण्यासाठी माटोळी आणि देखावा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

वैयक्तिक कुटुंबांसाठी राज्यस्तरीय माटोळी सजावट स्पर्धा 9 ते 12 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. या वर्षी माटोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक – रु. 20,000, द्वितीय पारितोषिक – रु. 15,000 तृतीय पारितोषिक – रु. 12,000 तसेच चौथे पारितोषिक रु. 10,000 आणि पाचवे पारितोषिक 8,000 त्याशिवाय रु. 5,000 ची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहे.

राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी देखावा स्पर्धा 13 ते 16 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. देखावा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक – रु. 35,000, द्वितीय पारितोषिक रु. 30,000, तृतीय पारितोषिक रु. 25,000 तसेच चौथे रु. 20,000 आणि पाचवे पारितोषिक रु. 15.000 त्याशिवाय रु. 10,000 ची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत आवश्यक स्पर्धक संख्या कमी झाल्यास ही स्पर्धा राखून ठेवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार खात्याला असणार आहे.

या स्पर्धेचे अर्ज कला आणि संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन पाटो, पणजी-गोवा, रवींद्र भवन-मडगाव, रवींद्र भवन-कुडचडे, रवींद्र भवन-साखळी, रवींद्र भवन-बायणा-वास्को व राजीव गांधी कला मंदिर-फोंडा येथे 9 ऑगस्टपासून उपलब्ध असणार आहेत. पूर्ण भरलेले अर्ज 30 ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी 0832-2404640, 2404636 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.