गोवा खबर : व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांनी (1 ऑगस्ट) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या, भारत-व्हिएतनाम संबंध घनिष्ठ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांच्या भक्कम पायावर उभारले गेले आहेत आणि परस्पर विश्वास व सामंजस्य आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सहकार्याचे आहेत. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि आमच्या हिंद-प्रशांत दृष्टिकोनातील महत्त्वाचा भागीदार आहे.
राजकीय आदान-प्रदानापासून संरक्षण भागीदारी, व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणूक, विकास सहकार्य, सांस्कृतिक संबंध आणि परस्परांच्या नागरिकांमधील दुवा अशा विविध सहकार्याच्या क्षेत्रांमध्ये आमचे द्विपक्षीय संबंध वैविध्यपूर्ण असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.
दोन्ही नेत्यांनी आपला सामायिक बौद्ध वारसा आणि संस्कृती संबंधांचा उल्लेख केला आणि व्हिएतनाममधील वारसा स्थळांच्या पुनर्संचयित करण्यासाठी सुरू असलेल्या सहयोगी प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांची भेट भारत-व्हिएतनाम सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.