गोवा खबर:शिर्डी येथे धारगळ येथील माजी सरपंच तथा विद्यमान पंच अनिकेत साळगावकर यांच्या सत्कार व त्यांचे सहकारी साईबाबांचे दर्शनासाठी आले असता भारतीय जनता पार्टी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य श्री भिमराज भालेराव यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. माजी सरपंच अनिकेत साळगावकर यांचा शाल घालून सत्कार केला.
धारगळ चे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य अनिकेत साळगावकर आपल्या सहकार्यासहित शिर्डी देवस्थानला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेत अनिकेत साळगावकर यांचा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
अनिकेत साळगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण देवदर्शनासाठी आपल्या सहकाऱ्यार्निशी आलो असता आपली दखल एक सामाजिक कार्यकर्ता आणि आपण सरपंच असताना जे धारगळ पंचायत क्षेत्रात कार्य केली. त्याची दखल घेऊन आपला या पवित्र भूमीत सत्कार होतो. हा आपला सत्कार नसून धारगळ वासियांचा सत्कार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी एडवोकेट मुरारी परब यांनी मनोगत व्यक्त करताना शिर्डी सारख्या पवित्र श्री साईबाबा देवस्थान परिसरात धारगळच्या युवकाचा या ठिकाणी सन्मान सत्कार होणे हे खरंच भाग्य आहे. आणि या भाग्याच्या क्षणी आम्हालाही उपस्थिती लावण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून अनिकेत साळगावकर यांनी भविष्यात मोठ्या प्रमाणात धारगळ पंचायत क्षेत्राच्या विकासाचा विस्तार करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावेत अशी त्यांनी मागणी यावेळी केली.
फोटो अनिकेत साळगावकर यांचा सत्कार करतानाही भीमराज भालेराव सोबत ॲड.मुरारी परब