गोवा खबर: संदीप धारकर, महाप्रबंधक यांनी 15 जुलै 2024 रोजी नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. 24 वर्षांच्या वैविध्यपूर्ण अनुभवाने त्यांनी नाबार्डच्या सहा कार्यालयांमध्ये देशभरात सेवा बजावली आहे ज्यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, महाराष्ट्र (मुंबई), मध्य प्रदेश आणि कर्नाटक आदि राज्यांचा समावेश आहे. त्यांच्या कौशल्य- क्षेत्रांमध्ये क्रेडिट नियोजन, ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा, ग्रामीण वित्तीय संस्थांना पुनर्वित्त, संशोधन आणि धोरण आखणी यांचा समावेश आहे. कर्नाटकातील एका प्रमुख प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या संचालकपदावरही त्यांनी ४ वर्षे काम केले आहे.

नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालय, पणजीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री संदीप धारकर यांनी सांगितले की, नाबार्डच्या कर्ज आणि बिगर-क्रेडिट हस्तक्षेपांद्वारे कृषी आणि ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांमध्ये राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमांना अधिक बळकट करणे, सहकार्य करणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे नाबार्डच्या फोकस क्षेत्रांमध्ये असेल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नाबार्ड राज्य सरकार, आरबीआय, बँका आणि इतर भागधारकांसोबत जवळून काम करेल.