गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉस्को येथील ‘अज्ञात सैनिकांच्या समाधी’ स्थळी श्रद्धांजली वाहिली. तसेच समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले.
‘अज्ञात सैनिकांचे समाधी स्थळ’ हे मॉस्को येथील क्रेमलिन भिंत इथे असलेले एक युद्ध स्मारक असून ते दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या सोव्हिएत सैनिकांना समर्पित स्मारक आहे.