Connect with us

गोवा खबर

प्रकाशन विभागाद्वारे प्रकाशित आणि मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी’ ने संकलन केलेल्या ‘गेटवेज् टू द सी – हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रीजन’ या पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन

Published

on

Spread the love

 

 

 

गोवा खबर:महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘गेटवेज् टू द सी – हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रीजन’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राज भवनात शनिवार 22 जून 2024 रोजी झाले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. नामांकित लेखकांच्या 18 लेखांचे ‘मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी’ (एम.एम.एम.एस.) ने केलेले संकलन असे या पुस्तकाचे स्वरुप आहे.

 

पुस्तकाच्या प्रकाशनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांनी एम.एम.एम.एस., 17 लेखक आणि दोन संपादकांना सन्मानित केले. मुंबईकरांनी या शहराचा प्राचीन सागरी इतिहास जाणून घ्यावा, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. प्रकाशन विभाग आणि एशियाटिक सोसायटीच्या सहयोगाने राज भवनातील दरबार हॉलमध्ये पुस्तकाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाला उपस्थित निमंत्रितांमध्ये इतिहासकार आणि इतिहासाची आवड असलेल्या जाणकारांचा समावेश होता.

एम.एम.एम.एस.चे संकलन असलेल्या या पुस्तकात मुंबई प्रदेश जसे की सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, कल्याण, ठाणे, पनवेल, अलिबाग, चौल, मांदाड आणि जंजिरा भागातील विविध बंदरे, गोदी यांच्या इतिहासाबाबत अधिकृत माहितीयुक्त लेख आहेत. इतिहासकार, संशोधक, सागरी तज्ञ, संवर्धन रचनाकार आणि लेखकांनी 18 प्रकरणांचे लेखन केले आहे. ऐतिहासिक बंदरे, गोदींसह आधुनिक बंदरे व गोदींच्या विकासाची गाथाही या पुस्तकात मांडली आहे. त्यामध्ये माझगाव गोदी, मुंबई बंदर, बॉम्बे गोदी, ससून गोदी आणि भाऊचा धक्का या ठिकाणांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला एम.एम.एम.एस.चे अध्यक्ष कॅप्टन के.डी. बहल, व्हाईस ॲडमिरल (निवृत्त) इंद्रशील राव, संपादक डॉ. शेफाली शाह, उपाध्यक्ष अनिता येवले, प्रकाशन विभागाच्या उपसंचालक संगीता गोडबोले यांच्यासह पुस्तकाचे लेखक उपस्थित होते.