गोवा खबर:गोवा टपाल विभागाने खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), पणजी यांच्या सहकार्याने काल, 20 मे 2024 रोजी पणजी फिलाटली ब्युरो येथे जागतिक मधमाशी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.पणजी मुख्य कार्यालयातील वरिष्ठ पोस्टमास्तर, जी.एस. राणे, आणि खादी आणि ग्रामोद्योग आयोग उपसंचालक,(KVIC) पणजी, विजेंद्र सिंग,यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला.

जागतिक मधमाशी दिनाचे महत्त्व दर्शविणारे एक अनोखे पाकिट आणि त्या प्रीत्यर्थ तीन चित्रमय पोस्टकार्ड या विशेष प्रसंगी,अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आले. मधमाश्या पालनाचे प्रमुख प्रशिक्षक मेल्विन डिसूझा आणि एनआयओचे माजी शास्त्रज्ञ आणि व्यासंगी टपाल अभ्यासक निवृत्त डॉ. एम.आर. रमेश कुमार यांच्या उल्लेखनीय उपस्थितीत जी.एस. राणे आणि विजेंद्र सिंग,यांच्या हस्ते त्यांचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला फिलाटेलिस्ट, केव्हीआयसी मधील कर्मचारी आणि पणजी मुख्य टपाल कार्यालयातील कर्मचारी यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
मेलविन डिसूझा यांनी जैवविविधता आणि शेतीसाठी त्याचे महत्त्व अधोरेखित करून मधमाशीपालनाची कला आणि विज्ञान यावर एक माहितीपूर्ण भाषण आणि प्रात्यक्षिक आयोजित केले. डॉ. एम. आर.रमेश कुमार यांनी जागतिक मधमाशी दिनाविषयी माहितीपूर्ण माहिती आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून सामायिक केली, ज्यामुळे पर्यावरणातील मधमाश्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल उपस्थित प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडली.
जागतिक मधमाशी दिनानिमित्त प्रसिद्ध केलेली खास डिझाइन केलेली चित्र पोस्टकार्डे 20 मे 2024 पासून पणजी फिलाटली ब्युरो येथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.