Connect with us

गोवा खबर

काँग्रेसच्या पक्षांतर विरोधी कायदा आणि जमीन  परिवर्तनावरील निर्बंधांना भाजप घाबरला : पवन खेरा

Published

on

Spread the love
गोवा खबर: गोवा हे आपल्या देशाचे अनमोल रत्न आहे आणि यासाठी या राज्याला ’कोल हब’ मध्ये बदलू देणार नाही, असे काँग्रेसचे मीडिया प्रभारी पवन खेरा यांनी गुरुवारी म्हटले. 
पवन खेरा यांनी गुरुवारी काँग्रेस हावस मध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि लोकांना गोवा वाचवण्यासाठी पाऊल उचलण्याचे आवाहन केले.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.
“लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभवाची भीती वाटत आहे. म्हणून त्यांनी अधिक खोटे पसरवण्यास आणि ज्वलंत मुद्द्यां पासून लोकांचे मन वळविण्यास सुरुवात केली आहे,” असे खेरा म्हणाले.
 ते म्हणाले की, भाजप सरकार आपल्या भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील जमिनीचे रुपांतर करत आहे. “त्यांनी आपल्या मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील मोठ्या जमिनीचे रूपांतर केले आहे. त्यांना गोव्याचा निसर्ग नश्ट करण्यापासून रोखले पाहिजे. आम्ही पर्यावरण संतुलन आणि गोव्याची जैवविविधता आणि तिची ओळख यांचे संरक्षण करू. गोव्याच्या अस्मितेचा आम्हांला अभिमान आहे, ज्याचे जगभरातून कौतुक होत आहे,” असे ते म्हणाले.
“भाजप गोव्यातील जैवविविधता संपवत आहे. गोव्याचे रक्षण करायचे असेल तर भाजपचा पराभव झाला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते अयशस्वी झाले, ”असे खेरा म्हणाले.
कोळसा वाहतुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, मोदी गोव्याला कोल हब बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे.
“आम्हाला गोव्याला कोळसा केंद्र बनवायचे आहे का? गोवा हे भारताचे भूषण आहे. आम्हाला गोव्याचे कोळशात रूपांतर करायचे आहे का,’’ असा सवाल त्यांनी केला.
 पक्षांतर करून मतदारांचा विश्वासघात करणारे आमदारांना अडवण्यासाठी पक्षांतरविरोधी कायदा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
“भाजपने आमदार आयात करून आणि विरोधकांना कमकुवत करून लोकशाहीची चेष्टा केली आहे. त्यामुळे आम्ही पक्षांतर विरोधी कायदा मजबूत करणार आहोत. अशा प्रकारे निवडून आलेले आमदारांना पक्ष बदलल्यानंतर त्यांना अपात्र ठरवले जाईल. एकदा हे झाले की, पक्षांतरांना प्रोत्साहन देऊन स्थापन झालेल्या राज्यांमध्ये भाजपचे कोणतेही सरकार राहणार नाही,” असे ते म्हणाले.
पक्षांतरविरोधी कायदा मजबूत झाल्यावर कोणीही पक्ष बदलण्याचा विचार करणार नाही, असे ते म्हणाले.
‘‘पक्षांतरविरोधी कायद्याबाबत भाजप नेत्यांना विचारले पाहिजे. ते उत्तर देण्याचे धाडस करणार नाहीत, ”असे ते म्हणाले.
“मोदींनी आपल्या मित्रांचे 16 लाख कोटी कर्ज माफ केले आणि 6 लाख कोटी सेस वसूल करण्यात अपयशी ठरले. मोदींना पुन्हा फक्त या भांडवलदारांसाठी सरकार बनवायचे आहे, सामान्यांसाठी नाही,” असे ते म्हणाले.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा हा लैंगिक छळात गुंतलेला असून एसआयटी स्थापन झाल्यानंतर तो जर्मनीला पळून गेल्याचे त्यांनी सांगितले.
“ त्याचे 2900 अश्लील व्हिडिओ आहेत. हा जगातील सर्वात मोठा लैंगिक गुन्हा आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या गुन्ह्यांची माहिती असूनही त्यांनी त्यांचा प्रचार केला. सत्ता मिळविण्यासाठी भाजप एवढ्या खालच्या पातळीवर गेले हे अस्वीकार्य आहे,” असे ते म्हणाले.
काँग्रेसचे सरकार आल्यावर सरकारी खात्यातील 30 लाख नोकऱ्या भरल्या जातील, असे ते म्हणाले.
“आम्ही या देशातील पीडित प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी आत्महत्या करत आहेत, महिलांवर गुन्हे घडत आहेत. आम्हाला ते थांबवायचे आहे,” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की भाजपने दक्षिण गोव्यात भांडवलदार उमेदवार उभा केला आहे, जो मोदी आणि त्यांच्या मित्रांच्या हितासाठी काम करेल.
“तिचा पराभव झाला पाहिजे. गोव्याला मोदींच्या भांडवलदार मित्रांचा नव्हे तर राज्य, युवक, शेतकरी आणि सामान्य माणसाचा विचार करू शकणारे प्रतिनिधी हवे आहेत,’’ असे खेरा म्हणाले.
ते म्हणाले की मोदी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे.