गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी तरुणांना पर्यावरणाचे जतन आणि संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे आणि आपल्या प्राचीन परंपरांना दृढ धरून आपल्या पूर्वजांनी प्रस्थापित केलेल्या वृक्षांचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याचे सांगितले.
राजभवन, दोना पावला येथे नुकत्याच पारंपारिक वृक्षारोपण ‘वृक्ष विज्ञानिका सदासु’ या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते.
पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले, “आपल्या लोकसंख्येच्या ३०% ३५ वर्षांखालील युवक आहेत आणि हे तरुण विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी असून हे लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशासाठी एक मोठा मौल्यवान स्त्रोत आहेत.” महात्मा गांधीजींना उद्धृत करून राज्यपालांनी “पृथ्वी, हवा, जमीन आणि पाणी हे आपल्या पूर्वजांकडून मिळालेले वारसा नसून, आपल्या मुलांकडून मिळालेले ऋण आहे, म्हणून आपण त्यांना जसेच्या तसे सुपूर्द केले पाहिजे.” असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांनी जुलै २०२१ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर स्वामीजींचा आदर करण्यासाठी त्यांना काणकोण तालुक्यातील पर्तगाळ मठाला भेट देण्याची संधी प्राप्त झाल्याचे सांगून पर्तगाळ मठाच्या पवित्र परिसरात असलेल्या हजार वर्ष जुन्या वटवृक्षाच्या अस्तित्वाबद्द्ल स्वामिजींनी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. .
राज्यपाल म्हणाले, “आपली मातृभुमी भारतवर्ष अनादी काळ स्पष्ट करते की वनस्पती हे संवेदनशील प्राणी आहेत. रिग वेद आणि अथर्व वेदा ने वनस्पतींमध्ये चेतना लक्षात घेतली आहे. वनस्पतीवरील आमचे प्राचीन निष्कर्ष आता जगाने सत्य म्हणून स्वीकारले आहे असे त्यांनी सांगितले.
राज्यपालांनी प्राचीन भारतात आमचे पवित्र धर्म ग्रंथ म्हणजे वेद , पुराण आणि इतिहासांनी सविस्तरपणे आणि स्पष्टपणे लोकांच्या जीवनात आणि संस्कृतीत झाडांचे महत्त्व वर्णन केले आहेत.
प्राचीन भारतापासून आधुनिक वैज्ञानिक उपलब्धीपर्यंत या विषयाच्या सर्व पैलूंचा समावेश असलेल्या भारतातील पारंपारिक वृक्षांवरील परिसंवादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. या परिसंवादात सुप्रसिद्ध तज्ज्ञ सहभागी होत असून ते निसर्ग, झाडे, वनस्पती इत्यादी विषयांवर त्यांचे मौल्यवान अभ्यासनिबंध सादर करतील असे ते म्हणाले. या परिसंवादातून सहभागींना या विषयांच्या विविध पैलूंवर माहिती मिळेल.
“आपण आपल्या नैसर्गिक पर्यावरणाच्या जतन आणि संरक्षणासाठी आपली वचनबद्धता पुन्हा पुष्टी करूया आणि या उदात्त कार्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रतिज्ञा करूया,” असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी लिहीलेल्या पांच पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. कुंकळी या पुस्तकात कुंकळीचा बंड, कावी कला, हेरिटेज म्युरल्स ऑफ गोवा, आयकॉन ऑफ माय लिटरेचर, विकसित भारत आणि काणकोण हेत्यांच्या गोवा संपूर्ण यात्रेदरम्यान काणकोण तालुक्यातील राज्यपालांना आलेले अनुभव सांगणारे पुस्तक आहे.
यावेळी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष प्रा. कुमुद शर्मा, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री सी अचलेंदर रेड्डी, गोवा विध्यापिठाचे उपकुलगुरू प्रा. हरिलाल मेनन, केरळ साहित्य अकादमीचे माजी सचिव श्री पैप्रा राधाकृष्णन उपस्थित होते.