Connect with us

गोवा खबर

ॲलेक्सी यांची शिवसेने मधून हकालपट्टी 

Published

on

Spread the love
गोवा खबर:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण गोवा जिल्हाप्रमुख ॲलेक्सी फर्नांडिस यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा जिल्हा ,मुरगाव मतदारसंघाचे उमेदवार म्हणून ॲलेक्सी फर्नांडिस यांनी अर्ज दाखल केला आहे.
शिवसेना UBT हा ईंडीया आघाडीचा घटक पक्ष आहे. अर्ज दाखल केले असल्याचे वृत्त कळताच ॲलेक्सी यांच्याशी संपर्क साधुन त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले होते आणि ॲलेक्सी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला होता असे राज्यप्रमुख जितेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले असून आज माघारीच्या दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेतली नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.
आमच्या संघटनेत अशा प्रकारच्या पक्षविरोधी आणि शिस्तभंग कारवाया खपवून घेतल्या जात नाहीत आणि शिवसेना नेते (गोव्याचे निरीक्षक) संजयजी राऊतसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांची तत्काळ पक्षातून हकालपट्टी केली आहे, असे कामत यांनी कळविले आहे. शिवसेना उबाठा पदाधिकारी आणि शिवसैनिक ,दोन्ही लोकसभा मतदारसंघात चांगली आघाडी मिळविण्यासाठी आघाडीतील इतर सर्व पक्षांसोबत परिश्रम घेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा जिल्ह्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते आणि शाखा विस्तार समितीचे प्रमुख राजू विर्डीकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मतदाता सर्वेक्षण समन्वयक श्री. झायगल लोबो हे निवडणुकीसाठी उत्तर गोवा समन्वयक आहेत.