Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेला विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्र निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात डॉ.सावंत म्हणतात, ‘ईद उल फित्र’चा आनंदोत्सव हा एकता, सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या पवित्र रमदान महिन्याची समाप्ती आहे. हा अद्भुत सण समाजात बंधुभाव आणि मानवता वाढविण्यासाठी लोकांना प्रेरणा देतो.

 ”हा सण आपल्याला समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो आणि समाजाच्या भल्यासाठी आणि विकसित भारतासाठी काम करण्याचे बळ देवो अशी मी प्रार्थना करतो”, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.