Connect with us

गोवा खबर

राज्यात रोजगार गॅरंटी देण्यात बीजेपी सरकार अपयशी:मनोज परब

Published

on

Spread the love
गोवा शिपयार्ड, आयुष हॉस्पिटल मध्ये रोजगार दिला असल्यास खासदार श्रीपाद नाईक यांनी जाहीर करण्याची मनोज परब यांनी दिले आव्हान
 गोवा खबर:मानवी विकास संस्था आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) यांनी संयुक्तपणे ‘भारत रोजगार अहवाल-२०२४’ काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध केला. आयएलओच्या अहवालानुसार भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरूण बरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार – माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. हे भयानक वास्तव नजरेसमोर ठेवून रेव्होलुशनरी गोवन्स पक्षाने काल शनिवारी पत्रकार परिषद घेत मोदी सरकार व राज्यात डबल इंजिन सरकारचे गुणगान गाणाऱ्या प्रमोद सावंत सरकारचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी आर.जी पक्षाचे प्रमुख व उत्तर गोवा लोकसभा उमेदवार मनोज परब तसेच प्रवक्ते अजय खोलकर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोठ मोठ्या व्यासपीठावर राहून, विकसित भारत, आत्मनिर्भर भारत अशाप्रकारे घोषणाबाजी देत असतात. त्याचबरोबर गोव्यात सुद्धा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील विकसित गोवा स्वयंपूर्ण गोवा ची नारेबाजी करत, जनतेला दिशाभूल करणारी मोठं मोठी स्वप्ने दाखवून आश्वासनांची खैराती वाटतात. मात्र आयएलओच्या अहवालातील आकडे पाहता वास्तवात चित्र वेगळेच असून, आमचा देश आणि आमचे गोवा राज्य हे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे वक्तव्य मनोज परब यांनी काल पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

Goa Tourism Department
पर्वरीत आज शिगमोत्सव!

सन २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने बीजेपी सरकार घडले तेव्हा मोदी की गॅरंट्या जरी नव्हत्या तरी सुद्धा कालाधन, स्विज बँक पैशांचे रिपोर्ट्स, १०० स्मार्ट सिटी करण्यासंदर्भात, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा, अशा बेसुमार आश्वासनांच्या खैराती जनतेला वाटण्यात आल्या, परंतु आजपर्यंत एकही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. राज्यातील स्मार्ट सिटीची तर हालत बिकट अवस्था आहे. त्यामुळे हजारो व्यावसायिकांच्या रोजिरोटीवर त्याचा परिणाम झालेला आहे, त्यांची उपजीविका धोक्यात आली त्याचबरोबर जनतेच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झालेला असून, आत्तासुद्धा जनता ते त्रास भोगत असल्याचे मनोज परब म्हणाले.
आयएलओच्या अहवालातील आकडे पाहता माध्यमिक तसेच उच्चशिक्षितांमधील बेरोजगारीचे प्रमाण सन २०००च्या तुलनेत (३५.२टक्के) २०२२मध्ये वाढून ६५.७टक्क्यांवर गेले आहे. लोकसंख्येत निम्म्याहून अधिक युवक आहेत, त्यांच्यातील बेरोजगारी ८३टक्के एवढी मोठी आहे. एवढेच नव्हे तर एकूण वेतनमानातही फारसा फरक पडलेला नाही, ते जवळजवळ ‘जैसे थे’ आहे. ह्या अहवालामुळे मोदी सरकार तसेच राज्यातील डबल इंजिन सरकारचा पर्दाफाश झालेला आहे. ह्या सरकारची अकार्यक्षमता दाखवून दिली आहे, त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. निवडणुका समोर ठेवून मोदी सरकारकडून हजारो – लाखो नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले जाते. पर्यटन क्षेत्रात, मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी गोवेकरासाठी रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे सांगत, राज्यातील युवांचा दिशाभूल केली जाते त्यांचा आपल्या राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोपही मनोज परब यांनी यावेळी केला.
मोदी सरकारने, ह्या डबल इंजिन सरकारने आजपर्यंत फक्त आणि फक्त मोठमोठ्या जाहिरातबाजी करून, जनतेची दिशाभूल केली आहे. राज्यातील उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी तर यापूर्वीच स्वतःच आपल्या भाषणातून सरकारची अकार्यक्षमता दाखवत, सरकारी, खासगी क्षेत्रातील नोकऱ्या उच्च अधिकारी स्वताच्या सगेसोयऱ्याना देत असल्याचे सांगितले आहे. गोवा शिपयार्ड मध्ये नोकऱ्या परप्रांतियांना दिल्या जातात. त्याचबरोबर राज्यातील बेरोजगारी वाढली असल्याचे मान्य करत, गोमंतकीय युवांवर अन्याय होत असल्याचा पर्दाफाश स्वतःच यापूर्वी केला होता. त्यानंतर त्यांनी गोवा शिपयार्ड, धारगळ पेडणे येथील आयुष हॉस्पिटलमध्ये गोवेकराना प्राधान्य देत नोकऱ्या देण्याचेही आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाचे काय झाले. धारगळ पेडणे येथील जमिनी बळकावून, शेतकऱ्यांच्या उपजीविका संपुष्टात आणून त्याच बरोबर स्थानिक लोकांचे अस्तित्व नष्ट करून उभारण्यात आलेल्या आयुष हॉस्पिटलमध्ये किती गोवे
कराना श्रीपाद नाईक यांनी नोकऱ्या दिल्या त्याचा अहवाल प्रसिद्ध करण्याचे उघड आव्हान मनोज परब यांनी नाईक यांना दिले आहे.
आज मोदी सरकार गॅरंटीच्या नावाने घोषणाबाजी देत सर्वत्र जनतेची दिशाभूल सुरू आहे. मात्र वास्तविक पाहता सर्व नोकऱ्या परप्रांतीयांच्या घशात घातल्या जात आहे. केंद्रात बीजेपी, राज्यात बीजेपी आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक असून सुद्धा गोवेकरांना नोकऱ्या दिल्या गेल्या नाही. मात्र करोडोंची मालमत्ता असलेल्या धेंपो घराण्यातील व्यक्तीला उमेदवार म्हणून घोषित करून, बहुजन समाजाच्या महिलांकडून फुलांचा वर्षाव करून घेतला जातो. युवकांना राजकीय फायद्यासाठी वापर केला जातो. हा जो सामान्य गोवेकरावर अन्याय अत्याचार सुरू आहे, ह्या पापाचे फळ बीजेपी सरकारला भोगावेच लागणार आहे. आयएलओच्या अहवालातील ह्या आकड्यामुळे बेरोजगारीचे निराशाजनक वास्तव समोर आले असून, २०४७ पर्यंत भारत विकसित होणार हा निव्वळ भ्रम आहे, असे याआधीही तज्ञ मंडळींनी म्हटले होते. त्यांचे हे कटू सत्य सांगण्यामागे बेरोजगारीचे हेच चित्र त्यांच्या डोळ्यासमोर होते हे सिद्ध झाले आहे. भारतीय जनता पक्षाला, मोदी सरकारला ह्या निवडणुकीत गोव्यातील युवाबरोबर सर्व गोवेकर त्यांची जागा दाखवून देणार असल्याचेही मनोज परब म्हणाले.