Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना ईस्टरच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना, विशेषतः ख्रिश्चन बांधवांना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

 आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ईस्टरचा दिवस येशूच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी पुनरुत्थानाचा दिवस आहे. ईस्टर म्हणजे मृत्यू, अंधार आणि वाईट शक्तींवर विजयाचे दैवी प्रतीक आहे. येशू ख्रिस्तानी प्रेम, करुणा, बंधुता, जबाबदारी आणि क्षमा या शाश्वत मूल्यांचा उपदेश केला. सध्याचे जग, अनेक मानवनिर्मित दुष्कर्मांनी ग्रासलेले आहे येशू ख्रिस्ताचा संदेश आपल्याला बदलण्यास मदत करतो आणि अधिक अर्थपूर्ण, शांत आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करूतो.

Goa Tourism Department
पर्वरीत आज शिगमोत्सव!

या पवित्र प्रसंगी, आपण सर्वांनी इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची आणि शांतता आणि सलोखा टिकवून ठेवण्याची शपथ घेऊया. या वर्षीचा ईस्टर सण सर्वांना पापावर विजय मिळविण्यासाठी आणि सर्वांमध्ये अधिक शांती, समृद्धी, आनंद आणि एकता आणण्यासाठी प्रेरणा देवो, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.