गोवा खबर:समाजकल्याण, पुरातत्व आणि पुराभिलेख मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी पर्वरी येथील सचिवालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरातत्व खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाचा शुभारंभ केला. या प्रसंगी बोलताना मंत्री श्री फळदेसाई यांनी या वेबसाईटमुळे लोकांना गोव्यातील संरक्षित स्मारके आणि स्थळांशी संबंधित माहिती मिळू शकेल आणि पुरातत्व खात्याच्या क्षेत्रात करीत असलेल्या कामाशी संबंधित माहिती उपलब्ध होईल.
ही वेबसाइट पर्यटकांना आणि इतिहासात रस असलेल्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणाना भेट देण्यास मदत होईल असे श्री फळदेसाई म्हणाले.
सुरुवातीस गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गटाने तयार केलेल्या या वेबसाइटवर माहिती तंत्रज्ञान खात्याने दुरूस्ती करून वेबसाइट पूर्ण केली.
यावेळी पुरातत्व खात्याचे संचालक श्री निलेश फळदेसाई आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
https://archaeology.goa.gov.in/ या वेबसाइटवर लोक भेट देऊ शकतात.