Connect with us

गोवा खबर

क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाकडून क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अर्ज आमंत्रित

Published

on

Spread the love

गोवा खबर:कांपाल पणजीतील क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने क्रीडा शिष्यवृत्तीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. चंपा देविंदर धिंग्रा स्पोर्ट्स ट्रस्टद्वारे क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते आणि ती गोव्यातील तरुण पात्र खेळाडूंना दिली जाते. प्रथम वर्ष २०२४-२५  साठी एकूण २५  शिष्यवृत्ती दिल्या जातील.

पात्र उमेदवारांकडे राज्य स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र असावे आणि वर्ष (२०२३-२४) साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले असावे, सहावी  ते बारावी पर्यंत शिकणारे विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी आणि पाहण्यासाठी अर्जदारांनी सदर खात्याच्या www.dsya.goa.gov.in वेबसाइटला भेट देऊ द्यावी आणि २० मार्च २०२४ पूर्वी  dir-spor.goa@nic.in वर ईमेलद्वारे अर्ज सादर करू शकतात.