Connect with us

गोवा खबर

राज्यपालांच्या “मूलभूत संरचना आणि प्रजासत्ताक” पुस्तकाचे प्रकाशन

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेले २१२ वे पुस्तक मूलभूत संरचना आणि प्रजासत्ताक” चे चंगनाचेरी, केरळचे मुख्य बिशप, जोसेफ पेरुमथोत्तम यांच्याहस्ते आणि जलस्त्रोत विकास, सहकार आणि प्रोवेदोरिया मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांच्या विशेष उपस्थितीत प्रकाशित झाले ,

पुस्तकाची पहिली प्रत श्री सुभाष शिरोडकर यांनी केरळच्या चांगनाचेरीचे मुख्य बिशप एच जी मार जोसेफ पेरुमथोत्तम यांच्याहस्ते स्वीकारली.

राजभवनच्या जुन्या दरबार सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. राज्यसभा खासदार श्री. सदानंद तानावडे आणि गोवा विद्यापीठाचे कुलगुरू श्री. हरिलाल मेनन यावेळी उपस्थित होते.

गोव्याच्या प्रथम महिला श्रीमती. रीता श्रीधरन पिल्लई यांनीही यावेळी उपस्थिती लावली.

यावेळी बोलताना राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी रामायण आणि महाभारतातून आपल्याला ‘यतो धर्मस्ततो जयः’ म्हणजे जिथे धर्म आहे तिथे विजय आहे याची शिकवण मिळते आणि हे सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य आहे असे सांगितले. धर्म हा कोणत्याही धर्मापुरता मर्यादित नाही असेही राज्यपाल म्हणाले.

पुस्तकातील सामग्रीची माहिती देताना राज्यपालांनी सांगितले की मूलभूत संरचना आणि प्रजासत्ताक पुस्तकात सुवर्णमहोत्सवी भाषणांचा आणि विशेषत: केशवानंद भारती व्ही/एस संन्यासी प्रकरणाचा समावेश आहे ज्याचा निर्णय १३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता आणि या निर्णयाची  सर्वात लांब सुनावणी ६६ दिवस चालली होती. .

पुस्तक प्रकाशन समारंभाला संबोधित करताना, केरळच्या चांगनाचेरीचे मुख्य बिशप, जोसेफ पेरुमथोट्टम यांनी आपण सर्व भारतीय संविधानावर विश्वास ठेवतो, जी आपली  मूलभूत रचना आहे आणि ती आपल्याला भारताचे अभिमानी नागरिक म्हणून सामर्थ्य आणि आत्मविश्वास देते असे सांगितले. भारताला राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही नेत्यांची गरज आहे, घटनेच्या कलम १४२ बद्दल उल्लेख करताना, केरळच्या चांगनाचेरीचे मुख्य बिशप जोसेफ पेरुमथोट्टम यांनी सांगितले की, “संपूर्ण न्याय” करण्यासाठी संविधानाने देशातील सर्वोच्च न्यायालयाला व्यापक अधिकार दिले आहेत.

जोसेफ पेरुमथोट्टम यांनी राज्यपालांचे त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि राष्ट्रासाठी केलेल्या सेवांबद्दल आभार मानले.

यावेळी बोलताना जलस्त्रोत विकास, सहकार आणि प्रोवेदोरिया मंत्री श्री. सुभाष शिरोडकर यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी अनेक राज्यपाल पाहिले  परंतु सध्याचे राज्यपाल उत्कृष्ट व्यक्ती आहेत असे सांगितले. श्री शिरोडकर पुढे नमूद करतात की, मूलभूत रचना आणि प्रजासत्ताक या पुस्तकात गेल्यावर विचारांनी त्यांना त्या धर्माची आठवण करून दिली, जो त्यांनी महाविद्यालयीन जीवनात राजा समुद्र गुप्त आणि राजा अशोक यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी वाचला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारातही तेच दिसून आले असेही मंत्री म्हणाले.

राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, आयएएस, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राज्यपालांचे विशेष अधिकारी श्री मिहीर वर्धन यांनी प्रास्ताविक केले.

राज्यसभा खासदार श्री. सदानंद तानावडे आणि गोवा विद्यापीठाचे कुलगुरू श्री. हरिलाल मेनन यांचीही भाषणे झाली.