गोवा खबर:राज्यांत पंचायत चलो अभियानास सुरवात झाली. हे अभियान २७, २८, २९ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२४ पर्यंत चालू राहील. प्रत्येक मंत्री आपल्या ठरविलेल्या कार्यक्रमाप्रमाणे स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनीधींसह पंचायतीना भेट देऊन सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतील. तसेच लोकांच्या समस्या आणि प्रस्न समजून घेतील.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पणजी आणि ताळगांव मतदारसंघ, आरोग्य मंत्री श्री. विश्वजीत राणे मुरगांव, नुवें, शिरोडा आणि मडकई मतदासंघ, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो कळंगुट, काणकोण, पेडणे आणि सांतआंद्रे, कृषी मंत्री रवी नाईक डिचोली आणि वाळपई, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर सांताकृझ, हळदोणा आणि सावर्डे, पर्यटन मंत्री रोहन खंवटे कुडचडे, दाबोळी, प्रियोळ आणि वेळ्ळी, क्रीडामंत्री गोविंद गांवडे सांगे, साळगांव, कुडतरी आणि कुंकळ्ळी, महसूल मंत्री आतानासियो मोन्सेरात वास्को, मडगांव आणि मये, वीज मंत्री रामकृष्ण/सुदीन ढवळीकर म्हापसा, साखळी आणि कुठ्ठाळी, मच्छिमारी मंत्री निळकंठ हळर्णकर फातोर्डा, फोंडा आणि कुंमारजुवा, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई पर्ये,मांद्रे, पर्वरी आणि थिवी आणि कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा नावेली, बाणावली, केपे आणि शिवोली विधानसभा मतदारसंघात भेट देतील.