गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जागतिक बँकेच्या भागीदारीत राज्यात सर्वसमावेषक वित्त सुविधा उभारल्यानंतर गोव्याने आपले हवामान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक आत्मविश्वास बाळगल्याचे सांगितले.
पर्यावरण खाते आणि नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड), लघु उद्योग विकास यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी प्रसंगी पर्यावरण मंत्री श्री. अलेक्सो सिक्वेरा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हे प्रतिपादन केले. बँक ऑफ इंडिया आणि वीज वित्त महामंडळ ज्यामध्ये सर्वसमावेषक वित्त सुविधेची घोषणा ‘इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स मीट’ च्या उद्घाटन सत्रात करण्यात आली आहे, जी हवामान क्षेत्रातील विचारवंत आणि बदल घडविणाऱ्यांची वार्षिक परिषद आहे.
पणजी येथे जागतिक बँक आणि राज्य सरकारची बैठक झाली. ही अशा प्रकारची पहिलीच हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा असेल जी उपराष्ट्रीय स्तरावर गोव्याला कमी कार्बन आणि हवामानातील लवचिक गुंतवणुकीची अंमलबजावणी करण्यासाठी सवलतीच्या वित्तपुरवठ्यात प्रवेश करण्यास आणि एकत्रित करण्यास सक्षम करील. मिश्रित वित्त – सार्वजनिक, खाजगी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हवामान फायनान्सचा समावेश असलेल्या गोवा आणि भारतातील इतर किनारी राज्यांना वेगाने तापमानवाढ होणाऱ्या हवामानाच्या प्रभावासाठी अधिक लवचिकता निर्माण करण्यास मदत करण्याची क्षमता आहे. पणजी येथे १९ ते २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री यांनी संतुलित गोव्यासाठी लवचिकता हा आमच्या दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे जो अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाला जोडतो आणि आमच्या पर्यावरणाच्या आरोग्यासाठी आणि आमच्या लोकांच्या विकास आणि कल्याणासाठी आमच्या आकांक्षा संतुलित करतो असे सांगितले. ही सर्वसमावेषक वित्त सुविधा आम्हाला आमच्या नियोजन, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये अधिक लवचिकता अंतर्भूत आणि कार्यान्वित करण्यास सक्षम करील. आम्ही आमच्या समुदायांना नवीन तंत्रज्ञान आणि बिझनेस मॉडेल्सच्या सहाय्याने सशक्त बनविण्यास उत्सुक आहोत जे आमच्या हवामान बदलाला प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.”
मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक बँकेकडून मिश्रित वित्त सुविधेअंतर्गत निधी प्राप्त करणारे गोवा हे पहिले राज्य ठरणार आहे. पर्यावरण मंत्री श्री आलेक्स सिक्वेरा यांनी सर्वसमावेषक वित्त सुविधेचा शुभारंभ हा शाश्वत विकासाच्या दिशेने आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. हे इलेक्ट्रिक मोबिलिटी, शाश्वत पर्यटन, कचरा व्यवस्थापन आणि जलसंवर्धन यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये आमच्या प्रयत्नांना गती देईल असे सांगितले.
सर्वसमावेषक वित्त इनोव्हेशन्स उच्च जोखीम प्रकल्पांना एकत्रित करण्यात मदत करू शकतात जे सकारात्मक, मोजता येण्याजोगे सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम निर्माण करतात- यामध्ये ग्राहकांसाठी चांगली आणि अधिक टिकाऊ उत्पादने आणि सेवा समाविष्ट आहेत. आम्ही गोव्यासोबत तेथील लोकांच्या आणि पर्यावरणाच्या कल्याणासाठी हवामान-प्रतिरोधक गुंतवणूक लागू करण्यासाठी काम करण्यास उत्सुक आहोत, असे हवामान बदल जागतिक सराव, जागतिक बँकेच्या जागतिक संचालक श्रीमती जेनिफर सारा यांनी सांगितले.
यावेळी मुख्य सचिव श्री पुनित कुमार गोयल आयएएस, साऊथ एशियारीजन ऑफ जागतिक बॅकेचे प्रॅक्टीस व्यवस्थापक श्री अभास झा याची भाषणे झाली.
नाबार्डचे उपसंचालक श्री जी एस रावत, सीडबीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री एस रामण, वीज वित्त महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती परमिंदर चोप्रा, गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव श्री प्रदिप सरमोकादम, पर्यावरण खात्याचे संचालक श्री जॉनसन फर्नांडिस व इतर यावेळी उपस्थित होते.
वित्त सचिव डॉ. व्ही कांदावेलू आयएएस यांनी आभार मानले.