गोवा खबर: क्रिडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने पुरूषांसाठी राज्य पातळीवर नागरी सेवा फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. फुटबॉल स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १५ मार्च पर्यंत सांताक्रुज फुटबॉल मैदानावर सकाळच्या सत्रात ९.०० वाजता आणि दुपारच्या सत्रात २.३० वाजता आयोजित करण्यात येईल. क्रिकेट स्पर्धा २६ फेब्रुवारी ते ३० मार्च पर्यंत कुंभारजुवा पंचायत मैदानावर सकाळच्या सत्रात ९.०० वाजता आणि दुपारच्या सत्रात २.३० वाजता आयोजित करण्यात येईल.