गोवा खबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७६व्या पुण्यतिथीनिमित्त आज काँग्रेस नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख आणि इतर नेते काँग्रेस कार्यालयात उपस्थित होते.
यावेळी बोलताना सार्दिन म्हणाले की, महात्मा गांधींनी देशासाठी बलिदान दिले. “भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनांतून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. भारताने प्रगती करावी अशी त्यांची इच्छा होती, मात्र नथुराम गोडसेनी त्यांची हत्त्या केली” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, काँग्रेस नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. “पण आज सत्ता काबीज करण्यासाठी फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण आम्ही पाहत आहोत. देशाच्या प्रगतीसाठी आपण दक्ष राहून निःस्वार्थपणे काम करण्याची गरज आहे,” ते म्हणाले.
सार्दिन म्हणाले, “देशाच्या कल्याणासाठी आपले सरकार परत आणण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण काम केले पाहिजे.
अमित पाटकर म्हणाले की, “महात्मा गांधीजींच्या मनात रामराज्य आणण्याचा विचार होता आणि त्यांनी त्या दिशेने आपले काम सुरू केले होते. त्यांनी अहिंसेचा मार्ग निवडला, पण अशा दूरदर्शी नेत्याची आरएसएस सदस्य नथुराम गोडसेने हत्या केली,”
“ महात्मा गांधीजीनी देशातील लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि शांततेचा मार्ग दाखवला, तरीही त्यांची हत्या झाली,” असे पाटकर म्हणाले.
“आपल्या मनात नथुराम घोडसेसारखे विचार असतील तर राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
पाटकर म्हणाले की, राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो, न्याय यात्रेच्या माध्यमातून लोकांना एकत्र करत आहेत, मात्र आरएसएस आणि भाजप त्यांना आडकाठी आणत आहेत.
हुतात्मा चौक-मापुसा येथे आयोजित कार्यक्रमात आमदार कार्लूस फॅरेरा म्हणाले की, महात्मा गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.
उत्तर जिल्हा आणि दक्षिण जिल्हा समित्यांनीही महात्मा गांधींना भावपूर्ण आदरांजली वाहिली. दक्षिण गोव्याचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा, जीपीसीसीचे सरचिटणीस जोसेफ वाझ, मोरेनो रिबेलो आदी उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, विजय भिके, सुधीर कांदोळकर, वीरेंद्र शिरोडकर, सेवा दल प्रमुख जयवंत प्रभुगावकर आदी उत्तर गोव्यातील कार्यक्रमात उपस्थित होते.