पर्पल थिंक टँकमधील पॅनेल चर्चा सामाजिक समावेशावर केंद्रित
गोवा खबर: आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टचा एक भाग म्हणून, पर्पल थिंक टँक विभागात नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल (NCPEDP) द्वारे आयोजित परिसंवाद मालिकेचे आयोजन केले होते.
या उपक्रमातील शेवटच्या दोन दिवशी मिशन अॅक्सेसिबिलिटीचे सह-संस्थापक अमर जैन यांच्यासह पॅनेल सदस्यांसह सामाजिक समावेशावर चर्चा झाली. या पॅनेलमध्ये एनसीपीईडीपीचे कार्यकारी संचालक अरमान अली; दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे राजेश अग्रवाल; हार्किन इन्स्टिट्यूटमधील दिव्यंगत्व धोरण विभागाचे संचालक डॅनियल व्हॅन संत; सेन्स इंटरनॅशनल इंडियाचे संचालक अखिल पॉल; एनसीपीईडीपीचे सदस्य जावेद अबिदी; आणि अण्णा विद्यापीठातील प्रमुख वैज्ञानिक आणि मानद प्राध्यापक यांचा समावेश होता.
एनसीपीईडीपीचे सदस्य अक्षय जैन यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी माहितीवर आधारित प्रभावी निर्णयक्षमता आणि धोरण निर्मितीसाठी अचूक व नेमकेपणाने सांख्यिकी संकलन करण्याचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “दिव्यांग व्यक्तींसाठी माहितीवर आधारित निर्णय घेण्यासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी सांख्यिकी संकलन करणे आणि त्याचे योग्य व नेमके विश्लेषण करण महत्त्वपूर्ण आहे. ही सांख्यिकी आपणास योग्य, प्रभावी योजना आणि धोरण विकसित करण्यास सक्षम करते. नागरिकही स्वतःतील दिव्यंगत्व ओळखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.”
ते पुढे म्हणाले की, भारतात हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. भारतातील दिव्यंगत्वाचा दर हा २.२%इतका नोंदला गेला आहे. जागतिक पातळीवरील दिव्यंगत्वाच्या दराशी ही विसंगती असतल्याचे दिसते. त्यामुळे सांख्यिकीतील नेमकेपणा आणि अचूकता यांचे महत्व याबाबत विचारवंत, धुरीण यांच्यामध्ये व्यापक व गंभीरपणे चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे.
सहाय्यक तंत्रज्ञान, आरोग्य विमा, दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण आणि रोजगार, दिव्यांग व्यक्तींचा राजकीय समावेश, सांख्यिकीचे विश्लेषण, सेन्सर्स आणि सामाजिक समावेश आणि नवीन नेतृत्वास प्रोत्साहन अशा नऊ गंभीर विषयांवर या उपक्रमात पॅनल चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या.