गोवा खबर:राजभवनने, गोवा विद्यापीठाचे उप प्रमुख (संशोधन) डॉ. प्रकाश पर्येंकर यांच्या “वर्सल” या कथासंग्रहासाठी प्रतिष्ठित “साहित्य अकादमी पुरस्कार” प्रदान केल्याबद्दल त्याच्या सन्मानार्थ “सत्कार कार्यक्रम” आयोजित केला आहे. गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांच्याहस्ते उध्या ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता राजभवनातील दरबार सभागृहात (जुने) सत्कार करण्यात येईल.
क्रीडा आणि युवा व्यवहार, कला आणि संस्कृती आणि आरडीए मंत्री, श्री. गोविंद गावडे, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त श्री. दामोदर मावझो, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू श्री. हरिलाल बी मेनन व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
गोवा विद्यापीठाचे उप प्रमुख (संशोधन) डॉ. प्रकाश पर्येंकर यांनी लिहिलेले कोकणी पुस्तक “वर्सल” हा कोकणी भाषेतील लघुकथांचा संग्रह आहे, ज्याचे राज्यपाल श्री. पिल्लई यांनी प्रकाशन केले होते.