Connect with us

गोवा खबर

नोव्हेंबर २०२३ मध्ये रस्त्यावरील अपघातात १८ जणांचा बळी

Published

on

Spread the love

गोवा खबर: वाहतूक संचालनालयाव्दारे नोव्हेंबर २०२३ या महिन्यात झालेल्या अपघातांचा आणि जारी केलेल्या चलन पावत्यांचा अहवाल देण्यात आला आहे.

अहवालानूसार २०० रस्त्यावरील अपघात झाले ज्यात १८ प्राणघातक अपघात (उत्तर गोवा ८ आणि दक्षिण गोवा १०) १४ गंभीर अपघात (उत्तर गोवा ९ आणि दक्षिण गोवा ५) ३६ किरकोळ अपघात (उत्तर गोवा १३ आणि दक्षिण गोवा २३) आणि १३२ विना दुखापत (उत्तर गोवा ७२ आणि दक्षिण गोवा ६०) समावेश आहे.

 रस्त्यावरील अपघातात एकूण १८ जणांना आपला प्राण गमवावा लागला (उत्तर गोवा ०८ आणि दक्षिण गोवा १०) १४ चालक, १ मागे बसलेला, १ ड्रायव्हर, १ सायकल चालविणारा आणि १ पादचाऱ्यांना प्राण गमवावा लागला.

१९ जणांचा गंभीर अपघात झाला (उत्तर गोवा १० आणि दक्षिण गोवा ९) तर ४५ व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्या (उत्तर गोवा १६ आणि दक्षिण गोवा २९)

नोव्हेंबर २०२३ च्या महिन्यात वाहतूक अधिकाऱ्यांकडून सुमारे ८३१० चलने देण्यात आली.