Connect with us

गोवा खबर

गोव्याची समृद्ध जैवविविधता, पश्चिम घाटाचे शाश्वत पर्यावरणीय पर्यटन आणि संवर्धनावर प्रकाश टाकण्यासाठी, ‘‘एकोज ऑफ अर्थ- ओंसोम्बल ऑफ द वाइल्ड चे आयोजन”

Published

on

Spread the love

~पश्चिम घाट आणि गोव्याचे पर्यावरण साजरे करणे हा ‘एन्सेम्बल ऑफ द वाइल्ड’ या कार्क्रमाचा उद्दिष्ट आहे.

~अर्थपूर्ण कला आणि संभाषणांमधून गोव्याच्या जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी, शाश्वत  पर्यावरणीय पर्यटनाच्या महत्त्वावरही हा कार्यक्रम भर देईल.

गोवा खबर: ‘एकोज ऑफ अर्थ’, कला, संस्कृती आणि संगीताच्या माध्यमातून शाश्वतता आणि संवर्धनाला प्रोत्साहन देणारा भारतातील सर्वात मोठा हरित महोत्सव, २०२४ मध्ये गोव्यात पदार्पण होणार आहे. लुप्तप्राय पश्चिम घाट आणि गोव्याच्या स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनावर प्रकाश टाकणारा असा हा कार्यक्रम  ‘ओंसोम्बल ऑफ द वाइल्ड;  एन इव्हनिंग ऑफ आर्ट, कल्चर, म्युझिक अँड मिनिंगफुल कॉन्व्हरसेशन अराउंड कंझर्व्हेशन’  या कार्यक्रमासह ५ जानेवारी २०२४ तो पदापर्ण होणार आहे.

 पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक असलेल्या आणि गोवा पर्यटन मंडळाच्या पाठिंब्याने, पणजी जिमखाना, सनसेट लॉन्स येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, कार्यक्रम युनेस्कोने मान्यताप्राप्त जैवविविधता हॉटस्पॉट असलेल्या पश्चिम घाटाचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करेल आणि कला, संस्कृती, संगीत यांचे  मिश्रण प्रदान करेल.

 

कला आणि संगीताचे प्रदर्शन करण्याव्यतिरिक्त, या कार्यक्रमात गोव्याच्या संवर्धन क्षेत्रातील दिग्गजांच्या दोन-पॅनल चर्चांचा समावेश आहे. पहिली चर्चा ‘ इकोट्यूरिझम: अ गार्डरेल टुवर्ड्स प्रोटेकटिंग गोवाझ  बायोडायव्हर्सिटी – इन असोसिएशन विथ द गोवा स्टेट डायव्हर्सिटी  बोर्ड’ यांची असून त्यात निर्मल कुलकर्णी ( हर्पेटोलॉजिस्ट /वन्यजीव छायाचित्रकार / कलाकार) , राजेंद्र केरकर ( महासचिव, म्हादेई बचाओ अभियान गोवा/ गोवा राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ/ गोवा राज्य जैवविविधता मंडळ), प्रा. एम.के. जनार्थनम (पीएचडी, गोवा स्टेट रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष, स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस अँड बायोटेक्नॉलॉजी, गोवा विद्यापीठ) यांचा समावेश आहे.

 

गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदिप व्ही. सरमोकदम हे चर्चेचे सूत्रसंचालन करतील.

पुढील चर्चेचा विषय ‘टेल्स ऑफ द वाइल्ड: एक्सप्लोरिंग गोवा – अ वेस्टर्न घाटस वोन्डरलँड- इन असोसिएशन विथ द वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर, इंडिया ‘ हा असणार आहे. डॉ. नंदिनी वेल्हो आणि बेनहेल अंताव यांच्यासोबत मॉडरेटर आदित्य काकोडकर हे चर्चेसाठी उपस्थित असणार आहे.

 

प्रतिभावक संगीतकार ८ वाजतापासून आपले सादरीकरण सादर करणार आहेत तसेच या कार्यक्रमात वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड-इंडिया आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळाने एकत्रितपणे क्युरेट केलेले फोटो प्रदर्शन, अपसायकल आर्ट इन्स्टॉलेशन आपल्याला अनुभवता येणार.

 

कला संस्कृती, संगीत आणि संवर्धनामध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी सकारात्मक व्यासपीठ म्हणून प्रचंड क्षमता असलेल्या ‘इकोज ऑफ अर्थ’ चा उद्देश पश्चिम घाट सारख्या पर्यावरणीय हॉटस्पॉट्सकडे लक्ष वेधणे, तसेच संगीत आणि स्थानिक समुदायांसोबत सक्रिय सहभाग यावर लक्ष केंद्रित करणे आहे.

 

“पर्यावरण विषयक जागरूकता, जबाबदार पर्यटन आणि संसाधन संवर्धनाला चालना देण्यासाठी गोवा पर्यटन मंडळाच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,” असे इकोज ऑफ अर्थचे संस्थापक आणि फेस्टिव्हलचे संचालक रोशन नेतळकर यांनी सांगितले.

 

याशिवाय, हा फेस्टिव्हल गोवा राज्य जैवविविधता मंडळ, डब्लूयू डब्लूयू इफ इंडिया आणि फेलिस फिल्म्स यांच्याशी सहकार्य करेल आणि पश्चिम घाटातील नाजूक जैवविविधता जतन करण्यासाठी स्थानिक भागधारकांच्या प्रयत्नांना साहाय्य करेल.

 

जैवविविधतेच्या हॉटस्पॉटची समृद्धता मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यासाठी ‘इकोज ऑफ अर्थ’ ने पश्चिम घाटाच्या किनारपट्टीवर वसलेल्या चोपडे  येथे फेब्रुवारीमध्ये तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Continue Reading