Connect with us

गोवा खबर

गोवा दालनामध्ये गोमंतकीय कलाकारांच्या सांस्कृतिक सादरीकरणांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Published

on

Spread the love

गोवा खबर:नवी दिल्लीतील  प्रगती मैदानावर आयोजित भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उभारण्यात आलेल्या, गोवा दालनाला दिल्ली आणि शेजारील राज्यांमधील लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या उदंड प्रतिसादाचे श्रेय दिनेश प्रियोळकर यांच्या नेतृत्वाखालील प्रियोळ कला संगमशी संलग्न असलेल्या कलाकारांच्या उत्तम सादरीकरणाला देता येईल.

गोवा दालनाच्या उद्घाटनापासून, हे कलाकार गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेच्या सादरीकरणावर भर देत आहेत. गोमंतकीय कलाकार विविध कला सादर करत आहेत, ज्यात पारंपारिक समई नृत्य, धनगर नृत्य, वीरभद्र, घोडेमोडणी, जागोर, देखणी आणि कुणबी नृत्य यांचा समावेश आहे. त्यांचे हे प्रदर्शन गोव्याच्या कला आणि संस्कृतीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर  प्रोत्साहन देण्यास मदत करत आहे. तसेच कला आणि संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे.

हा कार्यक्रम हॉल क्रमांक ३ मध्ये नियमित अंतराने सादर केला जात आहेत. दालनाला भेट देणारे लोक कलाकारांच्या कलात्मक प्रतिभेचे साक्षी होऊन, टाळ्यांच्या  कडकडाटाने त्यांचे कौतुक करीत आहेत.

याशिवाय राज्य सरकारने विशेषत: पायाभूत सुविधा विकास, कल्याणकारी योजना आणि उपक्रम या क्षेत्रात केलेली प्रगती तसेच ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’वर आधारित ऑडिओ व्हिज्युअल दाखविण्यात येत आहे. हा उपक्रमामुळे देखील गोवा दालनाला लोकांकडून उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे.