Connect with us

गोवा खबर

साळावली जल प्रकल्पातून मर्यादित प्रमाणात जल पूरवठा

Published

on

Spread the love

 गोवा खबर:१६० एमएलडी साळावली जल प्रक्रिया प्रकल्पाच्या मडगांव दुफांटो टोंक ते वेर्णा टांकी पर्यंतच्या जुन्या १२०० एमएम व्यासाच्या जलवाहिनीच्या गळतीची चार टप्प्यांमध्ये दुरूस्ती काम करण्याचे नियोजन केले आहे. त्या प्रमाणे २० आणि २१ नोव्हेंबर, ११ आणि १२ डिसेंबर २०२३,  १५ आनी १६ जानेवारी आणि १२ आणी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी वरील जलवाहिनीचे दुरूस्ती काम करण्यात येईल.

त्यासाठी १६० एमएलडी साळावली जल प्रक्रिया प्रकल्पातून वरील  दिवसात पाणी पूरवठा होणार नाही. परंतु १०० एमएलडी नव्या साळावली जलप्रक्रिया प्रकल्पातून रोजच्याप्रमाणे पाणी पूरवठा केला जाईल.  ग्राहकांनी या गैरसोईची नोंद घ्यावी, असे जल पूरवठा विभागाने कळविले आहे.