Connect with us

गोवा खबर

कमी दर्ज्याचा चिवडा, मिठाई  उत्पादक आणि विक्रेत्याना दंड

Published

on

Spread the love

गोवा खबर:अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याखाली केलेल्या एका कारवाईच्या प्रकरणात कमी दर्जाचे  मिक्स चिवडा उत्पादन आणि विक्री केल्यामुळे मे. साईबाबा बेकर्स एण्ड स्विट्स (उत्पादक), काणकाबांद पर्रा, बार्देस आणि साईबाबा स्विट्स एण्ड बेकरी (विक्रेता) शॉप क्र. ए-२-७, केनरा बँके समोर, मरड-म्हापसा या आस्थापनांचे मालक शेखर उसपकर यांना १०.०००/- रूपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

#ADVT 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे 31 ऑक्टोबर 2023 चे वेळापत्रक..

त्याचप्रमाणे दुसऱ्या एका कारवाईत कमी दर्ज्याची  `काजू एपल मिठाईची विक्री केल्यामुळे मे. भवानी स्विट्स एण्ड ड्राय फ्रुट्स, खावोजा मंजील, फेरा बायस, म्हापसा याआस्थापनांचे मालक विक्रम सिंग पुरोहित यांना २०,०००/- रूपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे.