गोवा खबर: गोमंतकीय खेळाडू ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होत आहेत आणि राज्यासाठी पदके पटकावित आहेत ही अभिमानाची गोष्ट असल्याचे पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी म्हटले आहे.
शनिवारी शापोरा नदीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रोईंग आणि क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते.

National Game Schedule for October 29, 2023 #NationalGamesGoa2023 #Goa
गोव्यात ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत, याचा मला अभिमान वाटत असून अत्यानंद होत आहे. काल नेटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो.
गोमंतकीय क्रीडा स्पर्धात भाग घेत आहेत आणि राज्यासाठी पदके मिळवित आहेत, हे पाहताना समाधान वाटत आहे. हे क्षण आमच्यासाठी अभिमानाचे आहेत. राज्यात रोईंग हा खेळ नसल्याने खेळाडूही नाहीत, गोव्यातील मुलांनी हा खेळ शिकला पाहिजे, असे ते म्हणाले. राज्याच्या विविध भागांतील युवकांनी खेळांत स्वारस्य दाखवून विविध क्रीडा प्रकार आत्मसात करायला हवेत, असे ते पुढे म्हणाले.
गोमंतकीय खेळाडूंनी गोव्याला आणि भारताला अभिमानास्पद अशी कामगिरी बजावयाला हवी. आमच्याकडे अनेक खेळाडू आहेत, त्यांनी क्रीडा स्पर्धात सहभागी व्हायला हवे.
गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व्हाव्यात यासाठी आमचे तडफदार मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला हे पाहून आनंद वाटला. आपले क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी या खेळात गोमंतकीय क्रीडापटूंना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजप सरकारने अनेक पावले उचलली असे ते म्हणाले.
क्रीडा स्पर्धेत सहभागी देशातील सर्व खेळाडू अभिनंदास पात्र आहेत, असे ते म्हणाले.