Connect with us

गोवा खबर

राज्य निवडणूक आयुक्तांतर्फे राज्यपालांना निवडणूक अहवाल सादर

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्य निवडणूक आयुक्त श्री डब्ल्यू.व्ही. रामनमूर्ती, आयएएस (निवृत्त) यांनी गोवा राज्य निवडणूक आयोगाने २०२१ आणि २०२२ मध्ये घेतलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वार्षिक अहवाल गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांना सादर केले. राज्य निवडणूक आयुक्तांनी राज्यपालांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोगाची भूमिका आणि जबाबदाऱ्यांचीही माहिती दिली.

राज्यपाल श्री पिल्लई यांनी भारतीय राज्यघटनेतील ७३व्या आणि ७४व्या दुरुस्तीनुसार कलम २४३के आणि २४३ झेडए नुसार राज्य निवडणूक आयोगांची स्थापना करण्यात आली आणि  हे स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून लोकशाही विकेंद्रित प्रशासनाची स्थापना आणि बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पे आहेत यावर भर दिला. गोवा राज्य निवडणूक आयोगाचे अहवाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित सर्व संबंधितांसाठी उपयुक्त ठरतील  असे सांगून राज्यपालांनी आपले मतही व्यक्त केले.

राज्यपालांचे सचिव श्री एम.आर.एम. राव, गोवा राज्य निवडणूक आयोगाचे सचिव श्री वेनान्सियो फुर्तादो आणि गोवा राज्य निवडणूक आयोगाचे सहाय्यक संचालक श्री सागर गुरव यावेळी उपस्थित होते.