Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांचे सैनिक आरामग्रहाला फास्ट ट्रॅक करण्याचे आदेश

Published

on

Spread the love

 

 गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पर्वरीतील मंत्रालयात संपन्न झालेल्या १९ व्या राज्य सैनिक मंडळाच्या बैठकीस उपस्थित होते.  सैनिक कल्याण खात्याचे सचिव मेजर वेणू गोपाल नायर यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत सैनिक आरामगृहाचे काम सुरू करणे , दक्षिण गोवा जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची स्थापनामाजी सैनिकांच्या विधवांचा थेट आरक्षित प्रवर्गात समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गट  आणि  पदांसाठी भरतीसशस्त्र दलात सामील झालेल्या गोव्यातील तरुणांसाठी आर्थिक प्रोत्साहनांची सुधारणा आणि माजी सैनिकांसाठी शस्त्र परवाना शुल्कात सूट या विषयांवरही चर्चा झाली.

 

दक्षिण गोव्यात राहणाऱ्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी मडगाव येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, स्थापन करण्यासाठी आवश्यक जागा लवकरात लवकर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जीएडी/सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले. सैनिक आरामगृहाचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे यासाठी त्यांनी जीएसआयडीसीला त्याचे बांधकाम जलदगतीने करण्याचे निर्देश दिले. सर्व समस्या असल्यास ते सोडविण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आणि माजी सैनिकांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करील असे सांगितले.

माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणासाठी मंडळाने विविध उपाययोजनांची शिफारस केली आहे यात कर्तव्ये पार पाडताना मारल्या गेलेल्या किंवा अपंग झालेल्या सशस्त्र दलातील कर्मचार्‍यांच्या अवलंबिताना अतिरिक्त अनुदानात वाढ करणेरोख अनुदानात सुधारणा करणे आणि जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम आणि चक्र मालिका शौर्य पुरस्कार प्राप्तकर्त्यांना रोख अनुदानात सुधारणा करणे आणि तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी माजी सैनिकांच्या वार्डांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे यांचा समावेष आहे.

 

या बैठकीला माहिती सचिव श्री सुभाष चंद्र आयएएस,  कॉ. विनित कुमार गुप्ताफ्लॅग ऑफिसर कमांडिंग गोवा एरिया (FOGA) चे प्रतिनिधीब्रिगेडियर रोहित मेहताडायरेक्टर रिसेटलमेंट झोन साउथ पुणे (DRZS), कॅप्टन सतीश कुमार भारतीय नौदल प्रतिनिधी केंद्रीय सैनिक बोर्ड,  प्रदीप नाईकसंजीव कुमार लालसर्व गोवा माजी सैनिक कल्याण संघाचे सदस्यमाजी रामदास महालेगृह खाते आणि कार्मिक खात्याचे अधिकारी यांची उपस्थिती होती.