Connect with us

गोवा खबर

खेडेकर आणि पं. कारेकर यांना गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करणार

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा राज्यातर्फे दिला जाणारा सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदाचा “गोमंत विभूषण पुरस्कार” लोककला क्षेत्रातील विनायक विष्णू खेडेकर २०१९-२०  आणि पं. प्रभाकर जनार्दन कारेकर यांना भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील २०२१-२२ वर्षासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, हे पुरस्कार ३० मे २०२३ रोजी गोवा घटक राज्य दिनी सकाळी १०.४५ दरबार हॉल, राजभवन, दोना पावला येथे वितरीत करण्यात येईल.

हा पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, विरोधी पक्षनेते श्री. युरी आलेमाव, मुख्य सचिव श्री. पुनीतकुमार गोयल, कला व संस्कृती सचिव श्री. मेनिनो डिसोझा, आयएएस आणि माहिती आणि प्रसिध्दी सचिव श्री. सुभाष चंद्रा, आय.ए.एस. यांच्या उपस्थितीत श्री. विनायक खेडेकर आणि पं. प्रभाकर कारेकर याना प्रदान करण्यात येईल.

तसेच श्री. विनायक खेडेकर आणि पं. प्रभाकर कारेकर यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे सकाळी ११.१० वाजता उद्घाटन होणार आहे.