Connect with us

क्रीडा खबर

एरोस्पेस अभियंता निहाल बेगने पटकावले आयर्नमॅन ७०.३ गोवा विजेतेपद 

Published

on

Spread the love

 

 

–महिलांमध्ये स्वित्झर्लंडची कॅटजिन शिअरबीक प्रथम, 

–टीम टिम शर्मा भारतीय महिलांमध्ये प्रथम.

 

गोवा खबर: पुण्यातील एरोस्पेस अभियंता निहाल बेग (२८) याने रविवारी पणजी येथे झालेल्या आयर्नमॅन ७०.३ गोवा ची दुसरी आवृत्ती जिंकली. त्याने भारतीय सैन्याच्या गतविजेत्या बिस्वरजित सायखोमचा पराभव केला.

 

या स्पर्धेत एकूण १४५० ट्रायथलीट सहभागी झाले होते ज्यात १.९ किमी खुल्या समुद्रात पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावणे साडेआठ तासांत पूर्ण होणार आहे.

खुल्या पाण्यात पोहणे (१.९ किमी) आणि ९० किमी सायकलिंगमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर बेगने २१ किमी धावण्याच्या शेवटच्या ७ किमीमध्ये सायखोमला मागे टाकले. एकूण ४ तास २९ मिनिटे आणि ४५ सेकंदांच्या प्रभावी वेळेसह प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आनंदीत झालेले बेग म्हणाले, “गेल्या वेळी मी आयर्नमॅन ७०.३ गोवाच्या पहिल्या आवृत्तीत दुसरे स्थान पटकावले होते, त्यामुळे यावेळी सायखोमच्या पुढे पूर्ण करणे चांगले वाटते.”

दरम्यान, बिस्वरजितने ०४:३७:२१ वेळ नोंदवून एकूण दुसरे, तर दिल्लीच्या ४० वर्षीय पंकज धीमानने ०४:४०:४१ सेकंदांसह तिसरे स्थान पटकावले. धीमान म्हणाले की,

“गेल्या वेळी, मी रिले स्पर्धेत भाग घेतला आणि आम्ही जिंकलो, पण यावेळी मला वैयक्तिक शर्यत करायची होती,”

 

महिलांमध्ये स्वित्झर्लंडच्या कॅटजिन शिअरबीकने ०५:१०:४६ वेळेसह प्रथम, बेंगळुरूच्या टिमटीम शर्माने ०५:२३:२१ वेळेसह दुसरे आणि मुंबईच्या केतकी साठेने ०५:४६:५१ वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

टीम टीम म्हणाली की, “वातावरण खूप गरम होते आणि हा एक कठीण कोर्स होता, विशेषतः धावणे. आम्ही सायकल चालवली तेव्हा थोडासा वाराही आला पण एकंदरीत ही एक उत्तम शर्यत होती,”

 

रिलेमध्ये, योस्काच्या आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने तयार केलेल्या संघांनी अव्वल तीन स्थान पटकावले. टी आय ऍडव्हेंचरने ०४:२९:०२ वेळेसह प्रथम ,  टी सर्व्हिसेस ०४:३२:२२ वेळेसह आणि तिसरे स्थान टीआयएएफ संघ (०४:३२:२८) ला मिळाले.

 

गेल्या दशकापासून गोव्यातील ट्रायथलॉन शर्यतींमध्ये नियमितपणे सहभागी होणारा स्विस नागरिक, पाब्लो एराट (५१), एकूण सहाव्या क्रमांकावर आहे. पाब्लो म्हणाले, “गोवा हे माझे दुसरे घर आहे. माझे येथे बरेच मित्र आहेत आणि मला वातावरण आवडते.”

 

महिलांमध्ये प्रथम स्थान मिळवणाऱ्या स्वित्झर्लंडच्या कॅटजिन शिअरबीक (२८) हिने गोव्यातील स्थानिक ट्रायथलॉन समुदायाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हणाली, “मी कार्यक्रमाच्या फक्त दोन दिवस आधी आले. एका स्थानिक सायकलस्वाराने मला त्याची सायकल दिली आणि स्थानिक ट्रायथलॉन क्लबने मला खूप मदत केली.”

 

निकाल:

प्रथम दहा क्रमांक पुरुष:

1.निहाल बेग (भारत): ०४:२९:४५

  1. बिश्वरजित सायखोम (भारत): ०४:३७:२१
  2. पंकज धीमान (भारत): ०४:४०:४१
  3. पी रावलू (भारत): ०४:४१:३६

5.ए कंदीकुप्पा (सिंगापूर): ०४:४२:५०

  1. पाब्लो एरात (स्वित्झर्लंड): ०४:४४:२५

7.मार्सेल किंग (बेल्जियम): ०४:४५:२३

8.MS अराफत (बांगलादेश): ०४:५२:१४

9.फराई दलू (झिम्बाब्वे): ०५:००:४६

10.उज्ज्वल आनंद (भारत): ०५:०१:३९

 

प्रथम पाच महिला:

1.कॅटजिन शिअरबीक (स्वित्झर्लंड): ०५:१०:४६

  1. टिम टिम शर्मा (भारत): ०५:२३:२१

३.केतकी साठे (भारत): ०५:४६:५१

  1. श्रीवाणी वायवी (भारत): ०६:०७:३९
  2. सु यिन ओंग (भारत): ०६:१४:२३