Connect with us

गोवा खबर

शाब्बास ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाची खिल्ली उडवण्याचे धाडस दाखवले : अमित पाटकर

Published

on

Spread the love
गोवा खबर :शाब्बास! गोव्यातील १.१० लाख बेरोजगारांच्या अहवालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निती आयोगाची खिल्ली उडवल्याबद्दल भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन. डॉ. प्रमोद सावंतानी १०२ टक्के कोविड लसीकरण सिद्धांताचा शोध लावला होता. भाजपने तुम्हाला लवकरच बक्षीस देण्याची गरज आहे. शाखेवर घेतलेल्या शिक्षणाचे हे  उत्तम उदाहरण आहे, अशी बोचरी टिका काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
गोव्यातील बेरोजगारीची नीती आयोगाची आकडेवारी चुकीची असून गोव्यात केवळ २० हजार बेरोजगार आहेत, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या  विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षांनी भाजपला मुख्यमंत्र्यांच्या हुशारीबद्दल त्यांना बक्षीस देण्याची विनंती केली आहे.
एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजने ठेवलेली आकडेवारी सदोष असल्याचा दावा करून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याच सरकारची खिल्ली उडवली आहे. मी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतो. शाखांवर  धडे घेतलेल्या व्यक्तीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.
गोव्यातील गुन्हेगारी माफिया, ड्रग माफिया आणि भिकारी माफिया यांना भाजप सरकार आश्रय देत आहे, असा काँग्रेस पक्षाचा नेहमीच दावा होता. आता मुख्यमंत्र्यांनी गोव्यात बाहेरील लोकांच्या सहभागाने गुन्हे घडत असल्याची कबुली दिली आहे. या बाहेरच्या लोकांवर कारवाई करण्यापासून त्यांना कोणी रोखले आहे? तथाकथित बाहेरचे लोक भाजपची बाजू घेत असल्यानेच मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत, असा दावा अमित पाटकर यांनी केला.
सत्तरी  येथील भाजप पदाधिकाऱ्याच्या कारखान्यातून जप्त करण्यात आलेल्या कॅटामाईन ड्रग्जचा तपास अहवाल सार्वजनिक करावा असे मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. सिद्धी नाईकच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा तपास का बंद करण्यात आला, यावर त्यांनी सफाई द्यावी? सोनाली फोगट मृत्यू प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी कर्लीजचे रॅस्टोरंटचे बांधकाम घाईघाईत पाडले होते का?, डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत.
२०१२ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारने गोव्याला क्राइम डेस्टिनेशन बनवले आहे. भाजप सरकारच्या सर्व गैरकृत्यांवर काँग्रेस पक्ष यापुढेही लक्ष ठेवेल, असे अमित पाटकर यांनी स्पष्ट केले