Connect with us

गोवा खबर

शिल्पी दुबे कामाक्षी सकिल्सची नवीन मार्केटिंग हेड

Published

on

Spread the love

 

 गोवा खबर: हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रापासून ते रोजगार आणि उच्च कौशलल्यापर्यंत सेवा देणाऱ्या कामाक्षी ग्रूपने शिल्पी दुबे यांची विपणन आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे. तर कामाक्षी कॉलेज ऑफ कलनरी आर्ट्स, कामाक्षी ओव्हरसीझ कन्सल्टन्सी ( के ओ सी) , कामाक्षी स्किल्स आणि फियर्स किचन यांचा संपूर्ण विपणन आणि व्यवसाय विकासाचे नेतृत्व आता शिल्पी करेन.

 

तसेच शिल्पी यांच्याकडे मानव संसाधन आणि विपणन क्षेत्रात दोन दशकांचा अनुभव आहे. तिने प्रतिष्ठित एनएमआयएमएस, मुंबई  येथून मानव संसाधनमध्ये  व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि भारती सल्लामसलत, शिक्षण आणि विकासापासून ते व्यवसायापर्यंतच्या विविध भूमिकेमध्ये तिने काम केले आहे. झेंता टेक्नॉलॉजी , प्लेन्मेन कन्सल्टिंग, सधरलेंड ग्लोबल सर्व्हिसेस, क्लब महिंद्रा होलिडेज आणि अलीला दिवा गोवा या संघांचे नेतृत्व पण केले आहे.

तर ह्या संदर्भात बोलताना शिल्पी दुबे म्हणाल्या की “मी काहीतरी वेगळे करण्याचे प्रयत्न करत होती ज्यामुळे मला वेगवेगळा विषयांमध्ये  काम करण्याची संधी मिळाली ज्यामुळे ही भूमी मला ऑफर करण्यात आली. तर आम्हाला अशी व्यक्ती हवी होती जी केवळ मार्केटिंग योजनांची रणनीती बनवू शकत नाही तर लोकांना समजून घेणारी आणि वैविध्यपूर्ण व्यवसायाच्या गरजांसाठी योजना तयार करू शकणारी  होती आणि शिल्पी दुबे याची परफेक्ट मॅच होती असे कामाक्षी ग्रुप सीईओ सिद्धार्थ सवकुर यांनी जोडले.