गोवा खबर:राज्यात गेल्या चार दिवसांपूर्वी सैफुद्दिन या इसमाने समाज माध्यमावर केलेल्या देशविरोधी घोषणेने राज्यभर जनमानसात तीव्र नाराजीचे सुर उमटत आहे. त्या आरोपीला स्थानिकांनी जाब विचारल्यानंतर त्याने दुसऱ्या साथीदाराचेही नाव घेतलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्या आरोपीच्या स्वताच्या समाज माद्यामावरच्या अकाउंट मध्ये सुद्धा अनेक देशविरोधी पोस्ट पाहायला मिळतात.याची दखल घेऊन रीव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे राज्यातील फोंडा, म्हापसा, मडगाव पोलिस स्थानकात ह्या देशविरोधी घोषणा देणाऱ्या आरोपीविरुद्ध सविस्तर तक्रार दाखल केलेली आहे.
म्हापसा येथे स्वतः रीव्होल्युशनरी गोवन्सचे सहसंस्थापक विश्वेश नाईक यांनी सविस्तर तक्रार दाखल केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेले चार दिवस झाले या घटनेला, तरीही एकाही पक्षाने, एवढा व्हिडिओ वायरल होऊनही या घटनेची दखल घेतली नाही. केंद्रात बीजेपी, राज्यात बीजेपी सरकार असूनही हाच बीजेपी पक्ष जो स्वता देशहित आधी नंतर बाकीचं म्हणणाऱ्या पक्षाने, आजपर्यंत ह्या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे याचाच अर्थ भाजपा सहित इतर सर्व पक्ष हे देशासाठी नसून फक्त स्वताच्या स्वार्थासाठी वेळोवेळी, समाज, जातीवाद आणि धर्माची भाषा बोलतात.
पुढे बोलताना विश्वेश नाईक म्हणाले की, गोव्यात अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत आणि अशाच झोपडपट्ट्यांमध्ये रोहिंग्या राहतात, जे संपूर्ण राज्याहित देशाला सुद्धा घातक आहेत. आजपर्यंत कोणत्याच सरकारने अशा बेकायदा झोपडपट्ट्यावर कार्यवाही केली नाही वोटबँक स्वतःचा राजकीय फायदाच पहिला
आतातरी सरकारने ह्या देशविरोधी घटनेकडे गंभीरतेने पाहावे.त्या आरोपि वर कडक कार्यवाही केली जावी, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये राज्यात अशा घटना घडू नये असेही विश्वेश् नाईक म्हणाले.