Connect with us

गोवा खबर

प्रगती साधण्यासाठी एकता आणि सलोख्याच्या मूल्यांचे पालन करा : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

 गोवा खबर:आज जुने सचिवालय पणजी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारताच्या ७५  व्या स्वातंत्र्यदिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात राष्ट्रीय तिरंगा फडकविला.

मुख्यमंत्र्यांनी एकता, आणि सलोखा या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले आणि त्याशिवाय आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही असे सांगितले. जरी आपण शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात चांगली प्रगती साधली असली तरी गोव्याला पूर्ण विकसित, प्रगतशील आणि दोलायमान राज्य बनविण्यासाठी आपल्याला खूप पुढे जावे लागेल असे ते म्हणाले .

 आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून डॉ. सावंत म्हणाले की त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आपण  स्वातंत्र्याची फळे उपभोगत आहोत आणि आपण त्यांचे सतत ऋणी राहिलो पाहिजे असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की  राज्यात आरोग्य, शिक्षण, पर्यटन, उद्योग या क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सरकारने जीएसआयडीसीच्या माध्यमातून राज्यभर विविध विकासात्मक प्रकल्प हाती घेतले आहेत. चांदेल आणि साळ येथील जलप्रकल्पात वाढ करून लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत असेही ते म्हणाले.

गोव्यातील स्वयंपूर्ण मिशनबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी  सर्वांसाठी घरे, वीज, सीवरेज आणि पाणी उपलब्ध करून देण्याची सरकारचा विचार आहे असे सांगितले. ते म्हणाले की सरकार सरकारी यंत्रणेचा वापर करून या कार्यक्रमावर लक्ष ठेवत आहे त्यामुळे सरकार स्वावलंबी होण्यासाठी वाटचाल करीत आहे. त्यांनी हे मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचे आणि इतरांचे आभार मानले. स्वयंपूर्ण मिशन २.० यशस्वी होण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांकडून पाठिंबा आणि सहकार्य मागितले आहे.

 लोकांच्या कल्याणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारने दयानंद सामाजिक सुरक्षा किंवा गृहआधार आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठीच्या विविध योजना राबविल्या आहेत आणि या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

 वन कायद्याच्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील आदिवासींना पूर्ण अधिकार देण्याचा सरकारचा विचार आहे.

या स्वातंत्र्य दि समारंभादरम्यान सरकारने गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञता प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यसैनिक आणि कुटुंबातील सदस्य किंवा स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीमती कविता शैलेश गावकर, घोडके, बाळ्ळी, केपे आणि श्रीमती. स्नेहा विश्वास देयकर, काग्याग्गळ, आंबावली केपे यांना अनुकंपा नियुक्तीपत्रेही देण्यात आली.

 मुख्यमंत्र्यांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान केली त्यात केंद्रीय गृहमंत्री पदक जिंकणारे डीवायएसपी श्री एडविन कुलासो, केंद्रीय गृहमंत्री पदक जिंकणाऱ्या श्रीमती इझिल्दा डिसोझा डीवायएसपी, श्री प्रबोध शिरवईकर, डीवायएसपी पोलीस पदक, श्री सचिन लोकरे, पीआय तपास केंद्रीय गृहमंत्री पदक जिंकणारे पोलीस, श्री रवींद्र देसाई, पोलीस, पोलीस पदक, श्री लाडू गावस एएसआय, पोलीस, पोलीस पदक, श्री अविनाश नाईक पीसी, पोलीस, पंतप्रधान जीवन रक्षण पुरस्कार, श्री श्रीकृष्ण आर. पर्रीकर, अग्निशमन आणि आपत्कालीन स्थानक अग्निशमन अधिकारी यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, कु. मिनाक्षी अनंत कुबल, मानद प्लाटून कमांडर, होमगार्ड यांना राष्ट्रपतीं होम मेडलने सन्मानित करण्यात आले. श्रीमती. नयन दिपू वेलिंगलर लेडी होमगार्ड स्वयंसेविका, गृहरक्षक, रक्षक आणि गुणवंत सेवेसाठी नागरी संरक्षण पदक, श्री. भरत पाटील, अध्यक्ष, बीजेएस, गोवा राज्य, (शांतिलाल मुत्था फाऊंडेशन) शिक्षण ज्यांना प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर श्री शेख इस्माईल ड्राफ्ट्समन, यांना प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माहिती व प्रसिद्धी खात्याने काढलेल्या ‘मार्टियर्स ऑफ गोवा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

भारतकर हेगडे देसाई प्रतिष्ठान केपे गोवा यांना जागतिक वेबवर ओ भारत पेपर्सची डिजीटल आवृत्ती लॉन्च केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.  भारतकार गोविंद पुंडलिक हेगडे देसाई यांचे “ओ भारत” मधील निवडक संपादकीयांचे दोन खंडांचे लोकार्पण करण्यात आले.

 सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी संचलनाची पाहणी केली.

वीज मंत्री श्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, महसूल मंत्री, श्री आतानासियो मोन्सेरात, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, खासदार श्री विनय तेंडुलकर,  अ‍ॅड. जनरल डी  पांगम,  आमदार श्री रुडॉल्फ फर्नांडिस, श्रीमती जेनिफर मॉन्सेरात, मुख्य सचिव, श्री पुनीतकुमार गोयल, आयएएस महापौर श्री रोहित मोन्सेरात, डीजीपी- गोवा श्री जसपाल सिंग आयपीएस, सरकारचे सचिव, एचओडी, वरिष्ठ सरकारी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, प्रतिष्ठित नागरिक, सभोवतालच्या शाळेतील शालेय विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते.