गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी आझादी का अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून राजभवनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण केले आणि १३ ऑगस्टपासून ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत दिवसरात्र आपापल्या घरांवर ध्वज लावण्याचे आवाहन केले.

आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून, राजभवनाने १२ ते १४ ऑगस्ट २०२२ आणि १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रतिष्ठित व्यक्ती, लेखकांचा सत्कार, अनाथाश्रम, निवारागृहे, एचआयव्ही संस्थांमधील मुलांसाठी स्वागत समारंभ असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे १५ ऑगस्ट रोजी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी राजभवनवर प्रथमच राष्ट्रीय ध्वज फडकविला जाईल.