गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारीऱ्यांनी म्हापसा नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी “नो पार्किंग विभाग” अधिसूचित केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग- ६६ च्या पश्चिमेकडील क्रॅश बॅरियर ते पेडे जंक्शनजवळील रुक्मिणी प्लाझा बिल्डिंग आणि पेडे जंक्शन ते रुक्मिणी प्लाझापर्यंतच्या रस्त्याच्या पट्ट्यापासून सुमारे १५० मीटर अंतरापर्यंतचा रस्ता नो पार्किंग विभाग म्हणून सूचित केला आहे.