Connect with us

गोवा खबर

ऑगस्ट  महिन्याचा रेशन कोटा

Published

on

Spread the love

गोवा खबर:ऑगस्ट  महिन्यासाठी अंत्योदय अन्न योजनेच्या रेशन कार्डधारकांना ३ रूपये दराने ३५ किलो तांदुळ दिले जाईल. अंत्योदय अन्न योजना- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या रेशन कार्डधारकाना प्रतिमाणसी ५ किलो तांदूळ मोफत देतील.

प्राधान्यक्रम कुटुंबाना ३ रूपये दराने लाभधारकामागे ५ किलो तांदुळ दिले जाईल. प्राधान्यक्रम कुटुंब- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या रेशन कार्डधारकांना लाभधारकामागे ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येईल.

एपीएल कार्डधारकांना १२.५० रूपये दराने प्रती कार्ड  ९ किलो तांदुळ आणि १० रूपये दराने ५ किलो गहू देण्यात येईल.

कल्याणकारी संस्थां योजना कार्डधारकांना तांदुळ ६.१५ रूपये दराने आणि गहू ४.८० रूपये दराने वितरीत केले जाईल.

 स्वस्त धान्य दुकान मालकांनी ३० जुलै  २०२२ पर्यंत आपला धान्य कोटा उचलून रेशन कार्डधारकांना वितरीत करावा. रेशन कार्डधारकांनी आपला रेशन कोटा संबंधित स्वस्त धान्य दुकानातून नेला पाहिजे. धान्यासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार किंवा नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडे करावी.