Connect with us

गोवा खबर

जलदगती न्यायाशिवाय जलदगती तपास हा गोमंतकीयांना मूर्ख बनवून, डोळ्यात धूळ फेक करण्याचा  प्रकार

Published

on

Spread the love
 गोवा टीएमसीने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर चढवला हल्लाबोल
 गोवा खबर:गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते ट्राजानो डी’मेलो, समील वळवईकर आणि प्रतिभा बोरकर यांनी पणजी येथील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, ‘एसआयटी’च्या संदर्भातील अटी जाहीर करण्यात अपयशी ठरल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा जोरदार निषेध केला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी न्याय मिळवून देण्यास असमर्थता दाखल्याबद्दल ट्राजानो  डिमेलो म्हणाले, ‘संपूर्ण प्रशासनावर नियंत्रण असूनही भाजप सरकारच्या नाकाखाली सर्व बेकायदेशीर प्रकार घडत होते .’ ते पुढे म्हणाले, ‘प्रशासनाच्या  २२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने  प्रश्न सोडवला जाणार का? हे २२ सदस्य प्रशासनात असतानाही गुन्हे घडतत होते.’’
प्रमोद सावंत यांच्या ताज्या वक्तव्यावर टीका करताना डी’मेलो म्हणाले, ‘एकतर मुख्यमंत्री गोंधळलेले आहेत किंवा ते लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. जलदगती न्यायाशिवाय जलदगती तपास म्हणजे गोव्यातील जनतेला मुर्ख करण्यासाठी धुराचा पडदा उभारण्याशिवाय दुसरे काहीही नाही.’ भाजप सरकारला जबाबदार धरून डी’मेलो म्हणाले, ‘ते संदर्भ अटी जाहीर करण्यात अपयशी का ठरले? तपास वेळेवर पूर्ण होणार का?’
पोलिसांबद्दल लोकांच्या चुकीच्या भावनेवर प्रकाश टाकताना, डी’मेलो म्हणाले, ‘पोलीस अधीक्षक या  प्रकरणांचा तपास न्याय पद्धतीने कसा काय करू शकतात, जेव्हा त्यांचे अनेक कनिष्ठ भूतकाळात त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या  नीट पार पाडू  शकले नव्हते .’ ते पुढे म्हणाले, ‘आमच्याकडे बेकायदेशीरपणे जमीन बळकावल्याच्या अनेक तक्रारी आणि  ‘एफआयआर’  अद्याप प्रलंबित आहेत, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे फसवणूक करणाऱ्यांना आणखी बळ मिळाले आहे.’
पक्षाच्या मागणीचा पुनरुच्चार करताना डी’मेलो यांनी ठामपणे सांगितले की, ‘एसआयटी’ने न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली काम केले पाहिजे आणि फसव्या विक्री करारांपत्रांना निरर्थक व रद्दबादल म्हणून घोषित करण्यासाठी कायद्याद्वारे रजिस्ट्रारला अधिकार दिले पाहिजेत.’