Connect with us

गोवा खबर

कविवर्य शंकर रामाणी यांचा जन्मशताब्दी सोहळा गोव्यात साजरा होणार

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:गोव्यातील सुप्रसिद्ध कवी शंकर रामाणी यांचा जन्मशताब्दी सोहळा २४ जून ते २६ जून रोजी गोव्यात साजरा करण्यात येणार आहे.

कविवर्य शंकर रामाणी जन्मशताब्दी सोहळा समितीचे सचिव डॉ. नितीन बोरकर याबद्दल माहिती देताना सांगतात की गोवा विद्यापीठाचे कुलगुरू ,डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष, गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष ,साहित्य अकादमीचे अध्यक्ष आणि त्यांची समिती व रामाणी कुटुंब एकत्रितपणे हा सोहळा आयोजित करणार आहेत.

कविवर्य शंकर रामाणी या गोव्याच्या सुप्रसिद्ध कवींनी १९५० ते २००३ या कालखंडात मराठी व कोकणी कवितेस आपले योगदान दिले होते. रामाणी यांची सात मराठी कवितेची पुस्तके तर चार कोकणी कवितेची पुस्तके प्रसिद्ध आहेत. १९९७ मध्ये मिळालेल्या साहित्य अकादमी पुरस्काराबरोबरच ते अन्य अनेक पुरस्कारांचे मानकरी होते.

२६ जून २०२२ रोजी शंकर रामाणी यांची जन्मशताब्दी आहे. त्यानिमीत्त साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसाच्या सोहळ्याचे पहिले दोन दिवस साहित्य अकादमी तर्फे विविध विषयाची चर्चासत्रे, कविवर्य रामाणी यांच्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम घेण्यात येईल. त्याचबरोबर कविवर्य रामाणी यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन होईल. यामध्ये त्यांच्या मराठी व कोकणी कविता तसेच त्यांचा विविध लोकांशी झालेल्या पत्रव्यवहाराचा समावेश असेल. यादरम्यान कविवर्य  शंकर रामाणी यांच्या मराठी व कोकणी कवितेच्या समीक्षेची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कविवर्यांची कविता आणि त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी दर्शवणारे प्रदर्शन यावेळेस लावण्यात येणार आहे.

या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत त्यांनी कवितेच्या क्षेत्रात केलेल्या योगदानाची माहिती असेल. यावेळेस त्यांच्या आयुष्यावर आधारित माहितीपट दाखवण्यात येईल.

यासंदर्भात सर्व माहिती ‘कविवर्य शंकर रामाणी’ (Poet Shankar Ramani) या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

नितीन बोरकर

9833869245

ई-मेल – ramanishankar100@gmail.com, borkar.nitin@gmail.com