Connect with us

गोवा खबर

हरमल समुद्रकिनारी राजस्थानच्या २७ वर्षीय पर्यटकाचा बुडून मृत्यू

Published

on

Spread the love

समुद्रात व्हिडिओ चित्रित करताना मोठ्या लाटेत वाहून गेला; जीवरक्षकांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडला

गोवा खबर : हरमल समुद्रकिनारी समुद्रात व्हिडिओ चित्रित करत असताना मोठ्या लाटेत वाहून गेल्याने राजस्थानमधील २७ वर्षीय पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. कमल सिंह वाघेला असे मृत पर्यटकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमल सिंह वाघेला हा आपल्या पाच मित्रांसह गोव्यात पर्यटनासाठी आला होता. हरमल समुद्रकिनारी समुद्रात व्हिडिओ चित्रित करत असताना अचानक आलेल्या जोरदार लाटेमुळे तो समुद्रात वाहून गेला.

या घटनेनंतर जीवरक्षकांनी समुद्रात शोधमोहीम राबवली. शोधमोहिमेनंतर कमल सिंह वाघेला याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Continue Reading