Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल, श्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील आणि देशभरातील लोकांना दिवाळीच्या शुभ आणि आनंदी प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दिवाळी हा दिव्यांचा सण असून  आपल्या देशातील एक महत्वपूर्ण सण आहे. धर्म, जात पात बाजुला सारून हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतिक आहे. दिवाळीच्या सणातून प्रेम, शांतता, भरभराट आणि एकतेचा प्रसार होतो. लोक दिवे लावून, आपली घरे सजवून, मिठाई आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करून व देवी लक्ष्मीची पूजा करून हा शुभ सण साजरा करतात. दिवाळी सण आम्हाला आपल्या जीवनातून नकारात्मकता दूर करून  आपल्या हृदयात दया, आशा आणि सकारात्मकता, रूझविण्याची आठवण करून देतो.

दिव्यांच्या या सुंदर उत्सवाच्या निमित्ताने, मी सर्वांना आवाहन करतो की आपण सामाजिक अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून आपल्या देशात शांतता, सामाजिक सलोखा, सद्भावना, संयम व समृद्धीसाठी पुन्हा एकदा कटिबद्ध होऊया. ही मूल्ये दिवाळीची खऱी भावना आणि तत्त्वे आहेत. याप्रसंगी आपण समाजातील सर्व घटकांमध्ये प्रेम, आदर आणि एकता पसरविण्याचा संकल्प करूया आणि एक शांत, सुसंवादी व समृद्ध राष्ट्र घडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.