Connect with us

गोवा खबर

मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाट्यकर्मींचा गौरव

Published

on

Spread the love

गोवा खबर:सम्राट क्लब मयेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त मये येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाट्यकर्मी सम्राट रमाकांत अणवेकर उपस्थित होते.

आयुष्यभर रंगदेवतेची सेवा केलेले अष्टपैलू नाट्यकर्मी व नेपथ्यकार गजानन बाबलो प्रभुगावकर व केशव उर्फ ज्ञानेश्वर रामनाथ कुट्टीकर यांचा सन्मानचिन्ह, श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सम्राट क्लबचे अध्यक्ष सम्राट विशांत पेडणेकर, हर्षा कौठणकर, जयेश गावकर, संजय फाळकर यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.